काँग्रेस आमदार नाना पटोले दिवसभरासाठी निलंबित

मुंबई : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस नाना पटोलेंनी गाजवला. काँग्रेसचे विधानसभेतील आमदार नाना पटोले अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात आक्रमक झाले. ते विधानसभाध्यक्षांच्या दिशेने धावून गेले आणि पोडियमवर चढले. नाना पटोलेंनी विधानसभाध्यक्षांशी वाद घातला. विधानसभेतील कामकाज चालवण्याच्या संकेतांचे नानांनी जाहीरपणे उल्लंघन केले. अखेर नाना पटोलेंना सभागृहातून दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले.

सदनातले सन्मानीय सदस्य लोणीकर आणि राज्याचे कृषीमंत्री सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. हा अपमान राज्यातला शेतकरी सहन करणार नाही. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी. मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही. हे अजिबात चालणार नाही. कारवाई झाली पाहिजे, असे आमदार नाना पटोले विधानसभेत म्हणाले. नानांनी वापरलेली भाषा असंसदीय आहे ही बाब विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लगेच पटोलेंना सांगितले.

तुमच्याकडून असंसदीय षेचा उपयोग होणं मला बरोबर वाटत नाही. हे योग्य नाही, असे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. नाना पटोले आपल्या जागेवरुन उठून राहुल नार्वेकर यांच्या आसनाजवळ गेले. तिथे ते आक्रमकपणे बोलत होते. अखेर विधानसभा अध्यक्षांनी दिवसभरासाठी नाना पटोले यांना निलंबित केले.
Comments
Add Comment

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

गावची जमीन गावातच, मोरवणे ग्रामसभेच्या ठरावाची सर्वत्र चर्चा

रत्नागिरी : कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण तालुक्यातील मोरवणे गावाच्या ग्रामसभेने एक ठराव केला आहे.