Maharashtra Assembly Session: पावसाळी अधिवेशनासाठी सुलभा खोडके तालिका सभाध्यक्ष

मुंबई: राज्य विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशन २०२५ ला आज सोमवार दिनांक ३० जुनपासून मुंबई येथे सुरुवात झाली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या तालिका सभाअध्यक्ष म्हणून जेष्ठ विधानसभा सदस्य सुलभा संजय खोडके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

पावसाळी अधिवेशनाचे कामकाज चालविण्यासाठी पीठासीन सभाअध्यक्ष अँड.राहुल नार्वेकर यांच्याबरोबरच सभागृह चालविण्यासाठी तालिका अध्यक्ष म्हणून सुलभाताई संजय खोडके यांचे नाव घोषित झाल्याने सभागृहातील सर्व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यंमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देखील उपस्थित होते.

तालिका अध्यक्षांचे काम काय असते?


राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात साधारणत: आठ तासांचे कामकाज चालणे अपेक्षित असते . अर्थातच आठ तास पीठासीन अध्यक्ष त्या खुर्चीवर बसून राहू शकत नाहीत. त्यामुळे अध्यक्ष अनुपस्थित असतील तेव्हा सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी तालिका अध्यक्षांचे एक पॅनल तयार करण्यात येते. या पॅनलवर महाराष्ट्र विधानसभेच्या नियम ८ पोट नियम १ अन्वये तालिका सभाध्यक्ष म्हणून आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

सुलभा खोडके ह्या महाराष्ट्र विधानसभेवर तिसऱ्यांदा निवडून आल्या असून एक अभ्यासू व विधानसभेच्या कामकाजही उत्तम जाण असलेल्या जेष्ठ सदस्य म्हणून सुद्धा त्यांची सभागृहात ओळख आहे. विधानसभेत ज्या पक्षाचे आमदार जास्त असतात. त्या पक्षातील जेष्ठ सदस्यांची तालिका सभाध्यक्ष म्हणून अधिवेशन काळात घोषणा करण्यात येते. त्यानुसार अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके यांची पावसाळी अधिवेशनाच्या तालिका सभाध्यक्ष म्हणून घोषणा झाली असून पीठासीन अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अनुपस्थितीत त्या अधिवेशनाचे कामकाज सांभाळणार आहेत.
Comments
Add Comment

बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ३१ ऑक्टोबरपर्यंत भव्य ग्रंथ प्रदर्शन

मुंबई : अभिजात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने व मॅजेस्टिक ग्रंथ दालनाच्या

महापालिका आयुक्तांनी घेतला मुंबईतील दोन प्रमुख रस्ते प्रकल्प कामांचा आढावा, दिले असे निर्देश

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे ते भाईंदर प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक

एकनाथ शिंदेंचे विश्वासू मंगेश चिवटेंच्या भावाला बेदम मारहाण

सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे यांचे बंधू आणि शिवसेना जिल्हाप्रमुख

वसईत गॅस पाईपलाईन फुटली

वसई : पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये वसंत नागरी परिसरात शनिवारी चार ऑक्टोबर रोजी सकाळी धक्कादायक घटना घडली.

मुंबई २०३० पर्यंत रेबीजमुक्त करणार, महापालिकेचा निर्धार

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल