सहा वर्षीय मुलीच्या चिकटलेल्या बोटांवर यशस्वी सर्जरी

ठाणे : जन्मजात हातापायाची बोटे चिकटलेली असल्यास भविष्यात त्याचा त्रास होण्याचा संभव असतो. वेळेत शस्त्रक्रिया करणे महत्वाचे असले तरी चिकटलेल्या बोटांची शस्त्रक्रिया करून त्यांची प्लॅस्टिक सर्जरी करणे खर्चिक असते; परंतु सर्वसामान्यांसाठी अशी शस्त्रक्रिया आता सिव्हिल रुग्णालयात होत असून, रुग्णालयात भिवंडीतील एका लहान मुलीच्या यशस्वी प्लॅस्टिक सर्जरीनंतर तिच्या डाव्या हाताची दोन चिकटलेली बोटं आता स्वतंत्रपणे हालचाल करू लागणार आहेत.


भिवंडी परिसरात राहणारी अंजू (नाव बदलले आहे) ही मुलगी सहा वर्षांची असून तिच्या दोन्ही हाताची मधले आणि बाजूच बोटं आणि पायाची करंगळी आणि बाजूचे बोट जन्मतःच चिकटलेली होती. त्यामुळे लेखन, खेळ, वस्तू उचलणे यासारख्या मूलभूत हालचाली करणेही तिला अवघड जात होते. तिच्या या स्थितीमुळे आईवडील चिंतेत होते, पण उपचारांचा खर्च परवडत नव्हता. अशा जन्मजात दोषांवर वेळेवर शस्त्रक्रिया करणे अत्यावश्यक असते.



अंजूच्या पालकांनी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयाचा पर्याय निवडला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धीरज महांगडे, यांच्या मार्गदर्शनाखाली अंजूच्या डाव्या हातावर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती प्लॅस्टिक सर्जन डॉ. अभिषेक धाकड यांनी दिली.


साधारण एक तासांच्या सर्जरीनंतर मधले व बाजूचे चिकटलेले बोट वेगळे करण्यात यश आले आहे. मुलीच्या हाताची हालचाल सुधारण्यास सुरुवात झाली आहे. डॉक्टरांनी सांगितले की, पुढील काळात योग्य फिजिओथेरपी आणि काळजी घेतल्यास ती बोटे पूर्णतः कार्यक्षम होतील. या शस्त्रक्रियेसाठी वरिष्ठ सर्जन डॉ. निशिकांत रोकडे, प्लॅस्टिक सर्जन डॉ. अभिषेक धाकड, भूल तज्ज्ञ डॉ. प्रियांका महांगडे, प्रीती पगारे, भक्ती प्रिठे आदींनी अथक परिश्रम घेतले.

Comments
Add Comment

ठाण्यात 'जय श्रीराम'वाला महापौर बसवा; नाहीतर 'हिरवे' गुलाल उधळतील!

मंत्री नितेश राणे यांचा इशारा ठाणे : ''एकीकडे संविधानाच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे धर्माच्या नावाने

मुरबाड तालुक्यात १५ जानेवारीला विज्ञान प्रदर्शन

मुरबाड :मुरबाड तालुक्यातील धसई येथे १५ जानेवारी २०२६ रोजी भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सेवा

निवडणूक कर्तव्य टाळणाऱ्या पवार स्कूलच्या ८० कर्मचाऱ्यांवर गुन्हा

कल्याण: कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ चे कामकाज पारदर्शक, सुरळीत आणि विहित वेळेत

कल्याण पूर्वेतील अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात बलात्कारातील आरोपी

कल्याण : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशन परिसरात आज तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. २१ वर्षीय एअर

ठाण्यात महायुतीचा वचननामा जाहीर

ठाणे स्मार्ट व ग्लोबल शहर बनवण्याचा निर्धार ठाणे  : महायुतीने ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आपला वचननामा

मंत्री नितेश राणे आज ठाण्यात

सीताराम राणे यांचा करणार प्रचार ठाणे  : ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५-ड चे भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीचे