Rajesh Meena: महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिवपदी वरिष्ठ आयएएस अधिकारी राजेश कुमार मीना यांची नियुक्ती

मुंबई: आज, ३० जून २०२५ रोजी वरिष्ठ आयएएस अधिकारी राजेश कुमार मीना (Rajesh Kumar Meena)  यांना मुख्य सचिवपदी (Chief Secretary of Maharashtra) नियुक्त करण्यात आले. सुजाता सौनिक (Sujata Saunik) निवृत्त झाल्यानंतर त्यांचा कार्यभार तात्काळ लागू झाला. राजेश कुमार मीना मूळचे राजस्थानचे असून, ते महाराष्ट्र कॅडरचे एक वरिष्ठ आणि कार्यक्षम प्रशासक मानले जातात.


राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील रहिवासी आणि १९८८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी राजेश कुमार मीना यांची महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे.  अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवर जबाबदारी सांभाळणाऱ्या या अधिकाऱ्याला आता महाराष्ट्र नोकरशाहीचे सर्वोच्च पद देण्यात आले आहे. 



राजेशकुमार मीना यांच्या नियुक्तीचे कारण


राजेशकुमार मीना यांच्यासोबतच राज्याच्या मुख्य सचिवपदासाठी गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इकबालसिंह चहल आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हेदेखील शर्यतीत होते. पण, प्रशासनात राजेशकुमार मीना हे सर्वात ज्येष्ठ असल्याने राज्याच्या मुख्य सचिव पदासाठी सरकारकडून त्यांच्या नावालाच अधिक पसंती देण्यात आली आहे.  

राजेश मीना महसूल विभागात एसीएस


राजेश कुमार मीना यांना कामाचा व्यापक अनुभव आहे. ते सध्या महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम करत आहेत. आतापर्यंत त्यांनी विविध विभागांमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. 



निवृत्तीच्या २ महिने आधी जबाबदारी


यापूर्वी सुजाता सौनिक महाराष्ट्राच्या सीएस होत्या, त्या आज (३० जून) निवृत्त झाल्या.  त्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव देखील होत्या. त्याच वेळी, राजेश कुमार मीना या वर्षी ऑगस्टमध्ये निवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीच्या २ महिनेआधी, महाराष्ट्र सरकारने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे मुख्य सचिव पदासाठी त्यांच्याकडे जुलै आणि ऑगस्ट असा दोन महिन्यांचा कालावधी असणार आहे. दरम्यानच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्या तर राजेशकुमार मीना यांना मुख्य सचिव पदासाठी मुदतवाढ मिळू शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. याआधी अजोय मेहता, नितीन करीर या दोन ज्येष्ठ माजी सनदी अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या काळात राज्याच्या मुख्य सचिव पदावर मुदतवाढ मिळाली होती.


 
Comments
Add Comment

एमपीएससीच्या ९३८ पदांसाठी भरती जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षासाठी जाहिरात

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा