उद्धव ठाकरेंचे बेगडी मराठी प्रेम, खासदार राणेंची टीका

मुंबई : मुख्यमंत्री असताना हिंदी सक्तीचा जीआर काढणारे उद्धव ठाकरे आता झोपेचं सोंग घेत आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पाठोपाठ खासदार नारायण राणे यांनीही उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरेंचे मराठी प्रेम बेगडी आहे. राजकीय स्वार्थासाठी उद्धव 'मराठी प्रेम' दाखवत आहेत. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंचे मराठी प्रेम कुठे गेले होते ? मराठी माणसाच्या नोकरी, व्यवसायासाठी, पोटाच्या प्रश्नासाठी उद्धव ठाकरेंनी काय केले ? मराठीच्या नावावर फक्त स्वतःचे कल्याण करुन घेतले. मराठी माणसाच्या आणि मराठी भाषिकांच्या कल्याणाचे काय ? असा प्रश्न खासदार नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्राची राजधानी असूनही मुंबईत मराठी माणसाची टक्केवारी १८ पर्यंत खाली घसरली आहे. याला जबाबदार कोण ? असाही प्रश्न खासदार नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. मागील दोन दशकांपेक्ष जास्त काळापासून मुंबई महापालिकेत ठाकरेंची सत्ता आहे. पण याच काळात मुंबईतून मराठी माणूस हळू हळू हद्दपार होऊ लागला. उद्धव ठाकरेंना मराठी माणसांविषयी प्रेम आहे असे ते म्हणतात. पण उद्धव ठाकरेंची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत का शिकली ? असा प्रश्न खासदार नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.

सरकारने दोन जीआर रद्द केले म्हणून विजयी मेळावा काढणे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असेच म्हणावे लागेल, या शब्दात खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

Comments
Add Comment

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

आपली पोरं सांभाळू शकले नाहीत, ते मुंबई काय सांभाळणार?

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली

एकनाथ शिंदे - गणेश नाईक यांच्यात मनोमिलन?

मंत्रालयात बंद दाराआड चर्चा; नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तिढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून उड्डाणे!

नवी मुंबई : बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरुवारपासून म्हणजेच २५ डिसेंबर २०२५ रोजी अधिकृतपणे