Gold Silver Rate: सोन्याच्या चांदीत घसरण कायम, सोन्याच्या दरात सहाव्यांदा घसरण ' हे नवे दर

प्रतिनिधी: आज शेअर बाजारात किरकोळ घसरण होताना सोन्याच्या दरातही किरकोळ घसरण झाली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार सोन्याच्या दरात सोमवारीही २४ कॅरेट प्रति ग्रॅम दरात १६ रूपयांनी घसरण होत दर पातळी ९७२६ रूपयावर पोहोचली आहे. २४ कॅरेट प्रति तोळा किंमत १६० रूपयांनी घसरत ९७२६० रूपयांवर पोहोचली आहे. २२ कॅरेट प्रति ग्रॅम दरात १५ रूपयांनी घसरत दरपातळी ९७२६ रूपयांवर पोहोचली तर २२ कॅरेट प्रति तोळा किंमत १५० रूपयांनी घसरत ८९१५० रूपयांवर पोहोचली आहे. १८ कॅरेट प्रति कॅरेट दरात १३ रूपयांनी घसरत ७२९४ रूपयांवर तर १८ कॅरेट प्रति तोळा किंमत १३० रुपयांनी घसरत ७२९४० रूपयांवर पोहोचली आहे.


सोने घसरणीचा ट्रेंड सोमवारीही कायम असल्याने गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात प्रचंड मोठी घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात किमान १.०% घसरण झाली जी प्रामुख्याने जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या निर्देशां कात १ ते १.५०% घसरणीमुळे झाली आहे.इराण इस्त्राईल युद्धविरामानंतर सोने व कच्चे तेल मोठ्या प्रमाणात स्वस्त झाले होते. आता ओपेक निर्णयानंतर तेलात वाढ होण्याची शक्यता असली तरी सोन्याच्या दरात अद्याप वाढ अपेक्षित नाही. सोन्याच्या अस्थिर घसरणीला घटत्या मागणीचा आधार आहे.


आज सकाळी मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांक (Gold Future Index) यामध्ये ०.१२% वाढ झाली आहे. युएस गोल्ड स्पॉट (US Gold Spot) निर्देशांकातही ०.१९% वाढ सकाळपर्यंत झाली होती. भारतातील एमसीएक्सवरील (Multi Commodity Exchange MCX) यामध्ये सोन्याच्या निर्देशांकात ०.०४% वाढ झाल्याने कमोडिटी बाजारातील दरपातळी ९५५०६.०० रूपये आहे. भारतीय सराफा बाजारात मुंबई पुण्यासह प्रमुख शहरांत ९७२६ रूपये २४ कॅरेट सोने प्रति ग्रॅम रूपये आहे. तर बहुतांश शहरात २२ कॅरेट सोने प्रति ग्रॅम दर ८९१५ तर १८ कॅरेट प्रति ग्रॅम दर ७३५० रूपये आहे.


सोन्यात का घसरण कायम ?


शुक्रवारी अमेरिका व चीनने दुर्मिळ खनिजे, चुंबक यांच्या व्यापारीत यशस्वी वाटाघाटी केली आहे. परिणामी बाजारातील सप्लाय चेनला त्याचा फटका बसलेला नाही. युएस मध्यस्थीनंतर मध्यपूर्वेकडील युद्धविरामानंतर सोन्याच्या मागणीत आणखी घसरण झाली आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी सोन्यासह चांदीकडे पाठ फिरवल्याने अजूनपर्यंत दरात उसळी आलेली नाही.


सोन्याबरोबर चांदीच्या दरातही घसरण !


सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही घररण कायम राहिली आहे. सलग तिसऱ्यांदा चांदीच्या दरात ही घसरण प्रामुख्याने सोन्याच्या व चांदीच्या मागणीत झालेल्या घटीमुळे झाली आहे. चांदीच्या उत्पादनातील पुरवठा सुरळीत असल्याने ही दर कपात कायम राहिली आहे.


प्रति ग्रॅम चांदीच्या दरात ०.१० रूपये घसरण झाल्याने किंमत १०७.७० रूपये आहे. तर चांदीच्या प्रति किलो किंमतीत १०० रूपयांची घसरण झाल्याने किंमत पातळी १०७७०० रूपये आहे. चांदीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्देशांकात म्हण जेच सिल्वर फ्युचर निर्देशांक (Silver Future Index) यामध्ये ०.३५% घसरण झाली आहे. भारतीय कमोडिटी बाजार एमसीएक्समधील चांदीच्या दरात ०.२०% वाढ झाली असून चांदीची दरपातळी एमसीएक्समध्ये १०५४४० रुपयांवर पोहो चली आहे.

Comments
Add Comment

अरबी शिकवणाऱ्या व्यक्तीवर अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई: अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याच्या गंभीर आरोपाखाली मुंबई पोलिसांनी शिवडी येथील एका धार्मिक संस्थेतून

ट्रम्प-जिनपिंग भेटीमुळे 'टॅरिफ युद्ध' थंडावणार?

चीन अमेरिकेचे कृषी, ऊर्जा उत्पादन खरेदी करणार; फेंटॅनाईल संकटावर मदत करण्याचे आश्वासन ग्योंगजू (दक्षिण कोरिया):

राजस्थानमध्ये 'अँटी-नॅशनल' कारवायांचा पर्दाफाश! दोन धर्मोपदेशकांसह ५-६ संशयित ताब्यात

एनआयए, एटीएस आणि आयबीची संयुक्त धाड जयपूर: राष्ट्रीय तपास संस्था, दहशतवाद विरोधी पथक आणि गुप्तचर विभागाने

छत्तीसगडला १४,२६० कोटींचे बुस्टर डोस!

पंतप्रधान मोदींकडून पायाभूत सुविधा, आरोग्य आणि ऊर्जेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन नवी दिल्ली:

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांच्या अध्यक्षतेखाली ‘उच्चाधिकार समिती’ गठीत

मुंबई : शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी

'शीशमहल' वाद आता पंजाबमध्ये!

केजरीवाल यांना 'चंदीगढचा आलिशान बंगला'! भाजपचा थेट आरोप; 'आप'ने फेक न्यूज म्हणून फेटाळले नवी दिल्ली/चंदीगढ: