शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार शेतीसंदर्भातील दैनंदिन माहिती

जिल्हा परिषद कृषी विभागाचा अभिनव उपक्रम


ठाणे : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीच्या कामात झाला तर, शेतकऱ्यांना किती सोयीस्कर होईल या उद्देशाने, ठाणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने ब्लॉगस्पॉट हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसंदर्भातील दैनंदिन माहिती घरबसल्या एका क्लिक वर उपलब्ध होणार आहे. त्यासह, कृषी विभाग या तंत्रज्ञानाचा वापर करत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. ब्लॉगस्पॉट या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसंदर्भातील दैनंदिन माहिती घरबसल्या एका क्लिक वर उपलब्ध होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.


ठाणे जिल्ह्यात सध्या एकूण १६२ रासायनिक खत विक्री केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांवरून खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अनुदानित खतांची विक्री करण्यात येते. मात्र अनेकदा खतांची उपलब्धता कळण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना वेळ व संसाधनांचा अपव्यय होतो. याला पर्याय म्हणून कृषी विभागाने ब्लॉगस्पॉट तयार केलेला आहे. (https://adothane.blogspot.com/p/box-sizing-border-box-margin-0-padding_72.html) हा पर्याय शेतकऱ्यांसाठी एक प्रगत व पारदर्शक डिजिटल साधन ठरत आहे.


या ब्लॉगस्पॉटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या रासायनिक खतांचा साठा, खतांचे प्रकार, केंद्र चालकांचा मोबाईल क्रमांक, यासारखी माहिती सहज उपलब्ध होते. यावर जिल्हानिहाय, तालुकानिहाय आणि केंद्रनिहाय माहिती दररोज अद्ययावत करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांना खत खरेदीचे अचूक नियोजन करण्यासह गरजेनुसार योग्य केंद्राची निवड करता येत आहे.


ब्लॉगस्पॉट वापरणे अत्यंत सुलभ आहे. हे कोणत्याही स्मार्टफोनवर मोफत उपलब्ध आहे. यावरील माहिती संपूर्णपणे पारदर्शक आणि सार्वजनिक वापरासाठी खुली आहे, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला योग्य वेळेत योग्य माहिती मिळू शकते.

Comments
Add Comment

मीरा भाईंदर होणार देशातील पहिले फ्री वायफाय शहर

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना विनामूल्य वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. १५ डिसेंबर

डोंबिवलीत मनसेला खिंडार!

दोन माजी नगरसेवक व नगरसेविका भाजपमध्ये डोंबिवली  : मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष आणि डोंबिवली पश्चिमेतील

जलमापक सहा महिन्यांपासून बंद; पाणीपुरवठा खंडित होणार

नादुरुस्त जलमापक बदलण्यासाठी पालिकेची मोहीम भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेकडून शहरातील जलमापक जर सहा

प्रचार तोफा थंडावण्यापूर्वी मतदानाच्या तारखांमध्ये केला बदल, निवडणूक अधिकाऱ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण

ठाणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत.

बाल हक्क आयोगाचे कडोंमपा अधिकाऱ्यांवर चौकशीचे आदेश

ड्रेनेजमध्ये पडून बालक मृत्यूप्रकरण कल्याण  : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निष्काळजीपणामुळे डोंबिवली येथे

भिवंडीत विकासकाकडून १०० कोटींचा घोटाळा?

फसवणूक झालेल्या कुटुंबाचे आ. संजय केळकर यांना साकडे ठाणे  : भिवंडीजवळील खारबाव येथे सुरू असलेल्या इमारत