वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या रिक्षाचालकांवर गुन्हे

डोंबिवली  : शहरातील पश्चिम रेल्वेस्थानक भागात वर्दळीच्या रस्त्यावर रिक्षा उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या दोन रिक्षाचालकांवर विष्णुनगर पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. विष्णुनगर पोलिस ठाण्याचे हवालदार श्रीराम मिसाळ, आंबिवले, अंकुलकर रेल्वेस्थानक परिसरात गस्त घालत असताना रिक्षाचालक राहुल कुमरे हा रिक्षा वाहनतळ सोडून महात्मा गांधी रस्त्यावरील रसरंजन हॉटेलसमोर प्रवासी वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने रिक्षा उभी करून होता.


रस्त्यात रिक्षा उभी केल्याने पादचारी, वाहतुकीला अडथळा येत होता. गस्तीवरील पोलिसांनी रिक्षाचालक राहुल कुमरे यास नियमबाह्य पद्धतीने रिक्षा रस्त्यावर उभी केल्याचे सांगितले. यामुळे अपघात होण्याची, वाहतुकीला अडथळा होत असल्याची कारणे देत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.



दुसऱ्या घटनेत हनुमंत दत्तात्रय पष्टे हे रिक्षाचालक डोंबिवली पश्चिमेतील सर्वाधिक वर्दळीच्या विष्णुनगर मासळी बाजाराच्या ठिकाणी रिक्षा वाहनतळ सोडून प्रवासी वाहतुकीसाठी उभे होते. ते गणेशनगर भागात राहतात.


विष्णुनगर मासळी बाजार भागात रेल्वेस्थानकातून बाहेर येणारे प्रवासी, महात्मा गांधी रस्ता, कोपर उड्डाणपूल, गुप्ते रस्ता भागातून पादचारी, वाहने येत असतात. या गर्दीच्या भागात हनुमंत पष्टे यांनी वाहतुकीला अडथळा होईल, अशा पद्धतीने रिक्षा उभी केली. वेगात असलेल्या वाहनाची धडक रिक्षेला बसली तर अपघाताची शक्यता होती.


त्यामुळे पोलिसांनी हनुमंत पष्टे यांच्यावर विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Comments
Add Comment

ठाण्यात 'जय श्रीराम'वाला महापौर बसवा; नाहीतर 'हिरवे' गुलाल उधळतील!

मंत्री नितेश राणे यांचा इशारा ठाणे : ''एकीकडे संविधानाच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे धर्माच्या नावाने

मुरबाड तालुक्यात १५ जानेवारीला विज्ञान प्रदर्शन

मुरबाड :मुरबाड तालुक्यातील धसई येथे १५ जानेवारी २०२६ रोजी भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सेवा

निवडणूक कर्तव्य टाळणाऱ्या पवार स्कूलच्या ८० कर्मचाऱ्यांवर गुन्हा

कल्याण: कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ चे कामकाज पारदर्शक, सुरळीत आणि विहित वेळेत

कल्याण पूर्वेतील अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात बलात्कारातील आरोपी

कल्याण : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशन परिसरात आज तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. २१ वर्षीय एअर

ठाण्यात महायुतीचा वचननामा जाहीर

ठाणे स्मार्ट व ग्लोबल शहर बनवण्याचा निर्धार ठाणे  : महायुतीने ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आपला वचननामा

मंत्री नितेश राणे आज ठाण्यात

सीताराम राणे यांचा करणार प्रचार ठाणे  : ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५-ड चे भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीचे