बदलापूरची जांभळे लंडनच्या बाजारपेठेत दाखल

बदलापूर : देशातील पहिले भौगोलिक मानांकन मिळालेली बदलापुरातील जांभळे आता देशाची सीमा ओलांडून लंडनच्या बाजारपेठेत दाखल झाली आहेत. औषधी गुण असणाऱ्या आणि रसरशीत जांभळाची चव आता लंडनमधील नागरिक घेणार आहेत. देशातील विविध भागातून परदेशात निर्यात झालेल्या जांभळांमध्ये बदलापूरच्या जांभळांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात मागणी वाढल्यास बदलापुरातील शेतकरी समृद्ध होणार आहे.


ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात भाभा अनुसंशोधन केंद्राच्या माध्यमातून जांभुळाचे संशोधन करण्यात आले होते. या संशोधनातून बदलापुरात आढळणाऱ्या जांभूळ फळांमध्ये मधुमेह या आजाराशी लढणाऱ्या तत्त्वांचा समावेश आहे. त्यामुळे बदलापुरातील जांभळाला भौगोलिक मानांकन मिळाले.


मागील दोन वर्षांत बदलापुरातील जांभूळ हे आंतरराज्य स्तरावर विक्रीस पाठवण्यात आले; मात्र यावर्षी या फळाने देशाची सीमा ओलांडून लंडनच्या बाजारपेठेत आपले स्थान भक्कम केले आहे. यंदा पहिल्यांदाच बदलापुरातून १० किलो जांभूळ हे लंडनच्या बाजारपेठेत दाखल झाले आहेत. तसे पाहिले तर जांभूळ या फळाला, शेल्फ लाइफ कमी असते. हे फळ झाडावरून तोडल्यानंतर चार ते पाच दिवसांत संपवणे गरजेचे असते. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर यंदा निर्यात केली आहेत. भविष्यात या जांभळांना मागणी वाढली, तर बदलापुरातील हजारो शेतकऱ्यांना रोजगार मिळणार आहे.

Comments
Add Comment

मीरा भाईंदर होणार देशातील पहिले फ्री वायफाय शहर

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना विनामूल्य वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. १५ डिसेंबर

डोंबिवलीत मनसेला खिंडार!

दोन माजी नगरसेवक व नगरसेविका भाजपमध्ये डोंबिवली  : मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष आणि डोंबिवली पश्चिमेतील

जलमापक सहा महिन्यांपासून बंद; पाणीपुरवठा खंडित होणार

नादुरुस्त जलमापक बदलण्यासाठी पालिकेची मोहीम भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेकडून शहरातील जलमापक जर सहा

प्रचार तोफा थंडावण्यापूर्वी मतदानाच्या तारखांमध्ये केला बदल, निवडणूक अधिकाऱ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण

ठाणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत.

बाल हक्क आयोगाचे कडोंमपा अधिकाऱ्यांवर चौकशीचे आदेश

ड्रेनेजमध्ये पडून बालक मृत्यूप्रकरण कल्याण  : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निष्काळजीपणामुळे डोंबिवली येथे

भिवंडीत विकासकाकडून १०० कोटींचा घोटाळा?

फसवणूक झालेल्या कुटुंबाचे आ. संजय केळकर यांना साकडे ठाणे  : भिवंडीजवळील खारबाव येथे सुरू असलेल्या इमारत