पहिल्या यादीत ६ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांचा अकरावीत प्रवेश

मुंबई : दहावीचा निकाल जाहीर होऊन दीड महिना उलटला तरीही राज्यातील विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश मिळाला नव्हता. यामुळे राज्यातील विद्यार्थी व पालकांकडून संताप व्यक्त केला जात होता. राज्याच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने राबवली जात असलेली ही अकरावी प्रवेश प्रक्रिया तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलली जात होती.


ढकलेल्या वेळापत्रकानुसार सोमवारी ही यादी जाहीर होणार होती. अखेर काम पूर्ण झाल्याने ही यादी शनिवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून पहिल्या प्रवेश यादीत राज्यातील ६ लाख ३२ हजार १९४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. यामध्ये कला शाखेच्या १ लाख ४९ हजार ७९१विद्यार्थ्यांचा, वाणिज्य शाखेच्या १ लाख ३९ हजार ६०२ विद्यार्थ्यांचा तर विज्ञान शाखेच्या ३ लाख ४२ हजार ८०१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सोमवारपासून ते ७ जुलैपर्यंत प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे.


या यादीत सर्वाधिक पहिल्या पसंतीच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असून ४ लाख ५७ हजार ८४१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. दुसऱ्या पसंतीचे ७७ हजार ०९९, तिसऱ्या पसंतीचे ३६ हजार ९०१ मिळाले आहेत. तर अर्ज केलेल्या १० लाख ६६ हजार विद्यार्थ्यांच्यापैकी अजूनही तब्बल ४ लाख ३३ हजार ८११ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीची वाट पहावी लागणार आहे.


१२ लाख ७१ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याचे जाहीर केले असले तरी या यादीत १० लाख ६६ हजार ५ विद्यार्थ्यांचा समावेश केला आहे. यामध्ये सर्वाधिक ६ लाख ९ हजार ७१८ विद्यार्थ्यांचे अर्ज विज्ञान शाखेसाठी आले आहेत.


तर कला शाखेसाठी २ लाख ३१हजार ३५६ आणि वाणिज्य शाखेसाठी २ लाख २४ हजार ९३१ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. या अर्जांपैकी एकूण ६ लाख ३२ हजार १९४ विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश मिळाला आहे. विज्ञान शाखेतून ३ लाख ४२ हजार ८०१, कला शाखेमध्ये १ लाख ४९ हजार ७९१, तर वाणिज्यमध्ये १ लाख ३९ हजार ६०२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. अजूनही राज्यातील ४ लाख ३३ हजार ८११ विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत. यामध्ये २.६६ लाख विद्यार्थी विज्ञान शाखेतील सर्वधिक आहेत. या विद्यार्थ्यांना अकरावीच्या पुढील फेऱ्यात प्रवेशाची वाट पहावी लागणार आहे.

Comments
Add Comment

संगीत साधनेच्या २० वर्षांचा उत्सव - १३६ वी प्रातःस्वर मैफल

प्रत्येक मैफलीत नवा कलाकार अशी संकल्पना मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन व प्रचारासाठी गेली दोन

‘इंग्रजी’ भाषेत नामनिर्देशनपत्र, शपथपत्र भरण्याची मुभा

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांना पत्र मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही

३०७ वर्षे नाताळ साजरा करणारे मुंबईतील ‘कॅथेड्रल’

चर्च आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळले ‘चर्चगेट’ मुंबई : मुंबईत आणि उपनगरात सध्या नाताळनिमित्त उत्साहाचे

स्वबळाची भाषा करणाऱ्यांकडे उमेदवारांचा दुष्काळ

काँग्रेसकडे मुंबईतील ३० प्रभागांमध्ये एकही इच्छुक नाही उत्तर मुंबईत उमेदवार शोधण्यासाठी करावी लागणार

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.