Municipal school : ठाण्यात फक्त ३८ मराठी शाळांना मुख्याध्यापक, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम...

ठाणे :  गेला अनेक वर्षांपासून पालिका शाळेत मख्याध्यापकांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे पालिकेतील शाळेत उपशिक्षकांना पदोन्नती देण्यास सुरवात केली. मात्र  मे महिन्यात काही उपशिक्षक सेवानिवृत्त झाल्याने इतर शाळेतील मुख्याध्यापकांची पदे रिक्त झाली आहेत. उर्दूमध्ये सुमारे १० आणि हिंदी माध्यमात साधारणपणे ४ मुख्याध्यापकांची पदे रिक्त असल्याची माहिती मिळाली आहे. उपायुक्त सचिन सांगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार पालिका शाळेतील पट १०० ते १५० आहे, त्या ठिकाणी मुख्यध्यापकांची निवड करण्यात आली. अशी माहिती उपायुक्त सचिन सांगळे यांनी दिली.


पालिका सेवेतील मोठ्या प्रमाणात अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पालिका शाळेती शिक्षकांचादेखील समावेश आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांची कमतरता भासू लागली. ठाणे महापालिकेच्या मराठी, इंग्रजी, गुजराती, उर्दू, अशा विविध माध्यमांच्या शाळा आहेत. या शाळेमध्ये मुख्याध्यापकांची निवड होणे आवश्यक आहे पण गेला दोन वर्षांपासून मुख्याध्यापकांची पदे भरली गेली नाहीत.


त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे अनेक मुख्याध्यापक दोन ते तीन वर्ग  सांभाळताना दिसत आहेत. मे महिन्याच्या अखेर प्राथमिक माध्यमातून उप शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. त्यानुसार ३८ मराठी शाळांना मुख्याध्यापक देण्यात आले आहेत. परंतु यातील चार ते पाच उपशिक्षक हे मेअखेर सेवानिवृत्त होत असताना त्यांनादेखील पदोन्नती देण्यात आली. त्‍यामुळे काही शाळेतील पदे पुन्हा रिक्त झाली आहेत. दुसरीकडे उर्दूमध्ये सुमारे १० आणि हिंदी माध्यमात सुमारे चार मुख्याध्यापकांची पदे रिक्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


Comments
Add Comment

मुंबईत शरद पवार गटाला धक्का! राखी जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार?

मुंबई: राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्षा राखी

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास

मुंबई उपनगरीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलणार

१८,३६४ कोटींचे ४०० किमी रेल्वे प्रकल्प मार्गी मुंबई : मुंबईची उपनगरीय रेल्वेव्यवस्था येत्या काही वर्षांत

सरकारी रुग्णालयांमध्ये डिजिटल सुविधा सुरू करणार

केईएम, जेजेमध्ये AI-आधारित शवविच्छेदन मुंबई : न्यायवैद्यक शास्त्राचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने एक

देशभरात वीज होणार स्वस्त

पावर ट्रेडिंग शुल्काबाबत केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचा निर्णय जानेवारी २०२६ पासून टप्प्याटप्प्याने

दिव्यांग शिक्षकांना निवडणुकीची ‘ड्युटी’

शिक्षक संघटनाची नाराजी मुंबई : दिव्यांग शिक्षकांना निवडणूकसंदर्भात कोणतेही कामकाज देऊ नये, असे आदेश असताना