Jagannath Yatra Stampede: डीएम-एसपींची बदली, दोन अधिकारी निलंबित...चेंगराचेंगरीत झालेल्या ३ मृत्यूंबाबत ओडिशा सरकारची मोठी कारवाई

ओडिशा: भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेदरम्यान पुरीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीची गंभीर दखल घेत, ओडिशा सरकारने कारवाईला सुरुवात केली आहे. ज्यात पुरीचे डीएम आणि एसपी यांची तात्काळ बदली करण्यात आली आहे. रविवारी पहाटे ४:३० वाजता श्री गुंडीचा मंदिरासमोर दर्शनासाठी जमलेल्या भाविकांची प्रचंड गर्दी झाली आणि त्यात भीषण चेंगराचेंगरीची घटना घडली. या चेंगराचेंगरीत तीन भाविकांचा मृत्यू झाला आणि ५० हून अधिक लोकं जखमी झाले. या घटनेनंतर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह आपत्कालीन बैठक बोलावली. तसेच या घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी जगन्नाथ भक्तांची माफी मागितली आहे.  "हा निष्काळजीपणा अक्षम्य आहे आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल." असे आश्वासन देखील त्यांनी दिले. 



एसपी-डीएमची बदली


प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या चेंगराचेंगरीची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. यात्रेदरम्यान सुरक्षेतील अनेक मोठ्या त्रुटी लक्षात घेता, पुरीचे एसपी विनीत अग्रवाल आणि डीएम सिद्धार्थ शंकर स्वैन यांची तात्काळ बदली करण्यात आली आहे. आता पुरीचे नवे पोलिस अधीक्षक पिनाक मिश्रा असतील, जे सध्या एडीजी क्राइम पदावर आहेत. ते यापूर्वी पुरीचे एसपी देखील होते. त्याच वेळी, खुर्दाचे जिल्हाधिकारी चंचल राणा यांची पुरीचे नवे डीएम म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पुरीचे डीसीपी विष्णू पती आणि कमांडंर अजय पाधी या दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेशही जारी केले आहेत, या दोघांनी सुरक्षिततेत 'अक्षम्य निष्काळजीपणा' दाखवला असल्याचे म्हटले आहे.



मृतांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत


मुख्यमंत्री माझी यांनी या प्रकरणाची प्रशासकीय चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत, जी विकास आयुक्तांच्या देखरेखीखाली केली जाईल. सरकारने मृतांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदतही जाहीर केली आहे. जेव्हा भगवान जगन्नाथ रथावर विराजमान होते, तेव्हा हजारो भाविक त्यांच्या दर्शनासाठी मंदिरासमोर जमले होते. अशावेळी सुरक्षिततेसाठी तैनात असणाऱ्या पोलिसांना गर्दी नियंत्रित करणे कठीण झाले. दरम्यान धक्काबुक्की झाली आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. 

Comments
Add Comment

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या