Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे वाढणार आहेत. महामेट्रो प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक बळ मिळणार असून, प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.


पुणेकरांसाठी यामध्ये एकूण १०२ कोच दररोज प्रवासी सेवा पुरवत आहेत. आता आणखी ४५ डबे वाढल्याने एकूण डब्यांची संख्या १४७ पर्यंत पोहचणार आहे. ट्रेनच्या या विस्तारामुळे पुणेकरांना मेट्रोतून प्रवास करताना गर्दीचा सामना करावा लागणार नाही आणि प्रवासाचा वेळही वाचेल, अशी आशा आहे. नवीन मार्गांवर काम पूर्ण झाल्यावर या ट्रेन सेवेत दाखल होतील, यामुळे मेट्रोचे जाळे अधिक मजबूत होईल.






  • सध्याच्या ट्रेन - ३४

  • सध्याचे कोच - १०२

  • वीन खरेदी केल्या जाणार्‍या ट्रेन - १५

  • नवीन वाढणारे कोच - ४५

  • एकूण ट्रेन (भविष्यात)- ४९

  • एकूण कोच (भविष्यात) - १४७

  • सध्याचे दैनंदिन प्रवासी - १ लाख ७० हजार

  • एकूण नियोजित दैनंदिन प्रवासी उद्दिष्ट - साडे-तीन लाखांपर्यंत



मेट्रोची प्रवासीसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. फीडर सेवेच्या माध्यमातून आम्ही मेट्रोचे प्रवासी वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत. सध्या आमचे दैनंदिन प्रवासी एक लाख ७० हजारांच्या घरात आहेत. त्यांच्याकरिता सध्या ३४ ट्रेनद्वारे प्रवासी सेवा पुरवली जात आहे. नुकत्याच दोन नव्या मार्गांना केंद्राकडून मान्यता मिळाली आहे. यामुळे आम्हाला आणखी नव्या ट्रेनची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी आणखी १५ ट्रेन उपलब्ध होणार आहेत. एक ट्रेन, तीन कोचची असणार असून, या १५ नव्या ट्रेनमुळे आगामी काळात मेट्रोच्या ताफ्यात ४५ डबे वाढतील असं महामेट्रोचे महाव्यवस्थापक हेमंत सोनावणे यांनी म्हटलंय.


ही खूपच आनंदाची बातमी आहे. सध्याच्या ट्रेनमध्ये विशेषतः पिक अवर्समध्ये खूप गर्दी असते. नवीन ट्रेनमुळे गर्दी नक्कीच कमी होईल. अन् आमच्यासारख्या प्रवाशांचा अनुभव निश्चितच चांगला होईल असं एक प्रवासी कुणाल चव्हाण यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई