अकरावी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे पालक संतप्त; विद्यार्थी तणावाखाली

मुंबई : शिक्षण संचालनालयाने अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवसापासून घातलेल्या गोधळानंतर पहिली यादीही पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे पालक व विद्यार्थी संतप्त झाले आहेत. अकरावीचे प्रवेश विलंबाने झाल्याने विद्यार्थ्यांचे होणार नुकसान कसे भरून काढणार, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. तर प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.


विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळावे यासाठी यंदा राज्य मंडळाने दहावी परीक्षा १५ दिवस आधी घेतली आणि निकाल १३ मे रोजी जाहीर केला. निकाल जाहीर करण्यासाठी शिक्षण विभागाने शिक्षकांवर दबाव टाकून उत्तरपत्रिका लवकर तपासून घेतल्या. त्यानंतर २१ मेपासून अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला. मात्र यंदा प्रथमच राज्यभरात केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक समस्येला सामोरे जावे लागले. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया नोंदणी पुढे ढकलण्यात आली. नोंदणी प्रक्रिया २६ जूनपासून सुरू करण्यात आली.


मात्र सातत्याने येत असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थी व पालक हतबल झाले होते. तांत्रिक अडचणींचा सामना करत अखेर ७ जून रोजी ऑनलाईन अर्ज नोंदणी पूर्ण झाली. परंतु तांत्रिक अडचणीचे शुक्लकाष्ठ कायम राहिल्याने १० जून रोजी जाहीर होणारी पहिली गुणत्तवा यादी २६ जून रोजी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना २६ जूनपासून सुरू होणारी प्रवेश प्रक्रिया सुरळीत चालेल अशी अपेक्षा होती. त्यासाठी विद्यार्थ्यांनी दिवसभर संकेतस्थळाला भेट दिली. यादरम्यान संकेतस्थळ बंद पडल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर गुरूवारी रात्री उशीरा शिक्षण संचालनालयाने पुन्हा पहिली गुणवत्ता यादी लांबणीवर टाकत ती ३० जून रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.


दहावीची परीक्षा १७ मार्च रोजी संपल्यापासून तीन महिने विद्यार्थी घरी बसून आहेत. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होण्याची शक्यता आहे. शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तुमच्या मार्गावरही आहे का?

मुंबई: मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी रविवारी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. १६

सात महिन्यांत ‘फुकट्यां’कडून मध्य रेल्वेची १४१ कोटींची दंड वसुली

मुंबई  : मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या २३.७६ लाख प्रवाशांकडून १४१ कोटी रुपये दंड वसूल

खरडलेल्या शेतजमिनींसाठी मिळणार माती, गाळ, मुरूम, मोफत !

मुंबई : अतिवृष्टी व पुरामुळे खरडून गेलेल्या शेतजमिनीला पूर्वस्थितीत आणण्यासाठी लागणारी माती, गाळ, मुरूम, कंकर

फास्टटॅग नसलेल्या वाहनचालकांना आजपासून दुप्पट पैसे मोजावे लागणार

यूपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्यांना १.२५ पट जास्त रकमेचा दंड मुंबई  : नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ

CSMT परिसरात सापडलेल्या त्या बॅगेत नेमकं काय सापडलं ?

मुंबई : देशातील प्रमुख शहरांमध्ये सुरक्षेची परिस्थिती अधिक ताणलेली असताना, मुंबईत आज पुन्हा एकदा संशयास्पद

मुंबईत मागील वर्षभरात कृष्ठरोगाचे ६२० नवीन रुग्ण

येत्या १७ नोव्हेंबर ते २० डिसेंबर पर्यंत कृष्ठरोग शोध अभियान, सुमारे ४९ लाख नागरिकांची होणार तपासणी मुंबई (खास