मध्य -हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेवर येत्या रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक मध्य,हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावर घेण्यात येईल.



मुख्य मार्ग


हा ब्लॉक मुख्य मार्गावर ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत अप आणि डाउन जलद मार्गावर घेण्यात येईल. या ब्लॉकदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.३४ ते दुपारी ३.०३ पर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद, अर्धजलद उपनगरी सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धिम्या मार्गावर वळवल्या जातील आणि त्यांच्या नियोजित थांब्याव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील आणि त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.


कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.४० पर्यंत सुटणाऱ्या अप जलद/अर्धजलद गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवल्या जातील आणि दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील आणि मुलुंड स्थानकावर पुन्हा अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त १० मिनिटे उशिरा पोहोचतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व दादर येथून सुटणाऱ्या डाउन मेल , एक्सप्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान ५ व्या मार्गावर वळवल्या जातील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व दादरला येणाऱ्या अप मेल , एक्सप्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे ते विक्रोळी स्थानकांदरम्यान ६व्या मार्गावर वळवल्या जातील.



हार्बर मार्ग


हार्बर मार्गावर हा ब्लॉक पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान (पोर्ट लाईन वगळून) अप आणि डाउन हार्बर लाईनवर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत घेण्यात येईल .
या ब्लॉकदरम्यान पनवेल येथून १०.३३ ते दुपारी ४.४९ पर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणाऱ्या अप हार्बर लाईन सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ९.४५ ते दुपारी ४.१२ पर्यंत बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाउन हार्बर लाईन सेवा रद्द राहतील.



ट्रान्स हार्बर मार्ग


पनवेल येथून ११.०२ ते दुपारी ४.५३ पर्यंत सुटणाऱ्या ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर लाईन सेवा आणि ठाणे येथून १०.०१ ते दुपारी ४.२० पर्यंत सुटणाऱ्या पनवेलकडे जाणाऱ्या डाउन ट्रान्स-हार्बर लाईन सेवा रद्द राहतील. या ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी विभागात विशेष लोकल चालवल्या जातील. ठाणे-वाशी/नेरुळ स्टेशन दरम्यान ट्रान्स-हार्बर लाईन सेवा उपलब्ध राहतील. या ब्लॉक कालावधीत पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असतील.

Comments
Add Comment

अवयव प्रत्यारोपणासाठी देशव्यापी एकसमान धोरणाचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

दानकर्त्यांची प्रत्यारोपणानंतर वैद्यकीय काळजी बंधनकारक… मुंबई : देशभर अवयव प्रत्यारोपणासाठी एकसमान व

मालाड, कांदिवली, माटुंगा, परळमधील उद्याने, क्रीडांगणाचा होणार विकास

महापालिकेने मागवली २६ कोटींची निविदा मुंबई (खास प्रतिनिधी) : मालाड (पूर्व), येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे

मुंबईत २०० पेक्षा वायू गुणवत्ता निर्देशांक असल्यास उद्योग आणि बांधकामे बंद करा

महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांचा गय

मुंबईत निवडणुकीची चाहूल; राज्य सरकारचा पुनर्विकासाला चालना देणारा मोठा निर्णय

मुंबई : मुंबईतील बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच राज्य सरकारने नागरिकांना थेट लाभ

मुंबईकर गारठले; थंडीमुळे पारा १६.२ अंशावर !

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत हिवाळ्याची चाहूल

मुंबईत बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार ; कारमध्ये झाडल्या गोळ्या

मुंबई : मुंबईत भर दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप परिसरातील एका व्यावसायिकांवर हल्ला झाला.