मोठ्या पीओपीच्या गणेशमुर्त्यांचे खोल समुद्रात होणार विसर्जन

पीओपीवरील बंदी उठवल्यानंतर मंडळांना मिळणार दिलासा


मुंबई : ‘पीओपी’वरील बंदी उठवल्यानंतर आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या पीओपीच्या गणेशमुर्त्या खोल समुद्रात विसर्जन करण्याचा मार्गही खुला होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता.२७) सह्याद्री अतिथीगृहावर याबाबतच्या बैठकीत धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांनी दिले.


‘पीओपी’वर बंदी आल्यामुळे राज्यातील मूर्तिकार आणि त्यावर विसंबून असणारे सर्व घटक यांचा रोजगार धोक्यात आला होता. याप्रकरणी सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी पुढाकार घेतला. त्यातच न्यायालयाने ‘पीओपी’वरील बंदी उठली आहे. मात्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या पीओपी गणेशमुर्त्या विसर्जन करण्याबाबत सरकारला आपली भूमिका न्यायालयात मांडत आहे.


याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहावर उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला मंत्री शेलार यांच्यासह नगर विकास, पर्यावरण, नगरपालिका, महापालिका, यासंबंधीत प्रशासकीय अधिकारी आणि राजीव गांधी विज्ञान-तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.


पीओपी आणि नैसर्गिक जलस्त्रोतांबाबत राष्ट्रीय हरित लवादाने दिलेली मार्गदर्शक तत्वे तसेच न्यायालयाने दिलेले आदेश, डॉ. काकोडकर समितीने केलेला अभ्यास व त्याचा अहवाल यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. डॉ. काकोडकर समितीच्या अभ्यासानुसार, ‘मोठ्या मुर्त्यांचे खोल समुद्रात विसर्जन होऊ शकते, त्यादृष्टीने अभ्यास करणे आवश्यक आहे, याबाबत आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.


घरगुती गणेशाच्या मूर्ती या कृत्रिम तलावात विसर्जित केल्या जातात तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या मूर्ती समुद्रात विसर्जन करण्याबाबत ही राजीव गांधी विज्ञान-तंत्रज्ञान आयोगाने सकारात्मक दिसून येते आहे. तर छोट्या मुर्त्यांनाही समुद्रात विसर्जन करण्याबाबतचा मुद्दा आता चर्चेत आला आहे. याबाबत आज झालेल्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली.


सर्वंकष धोरण तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मोठ्या मुर्ती खोल समुद्रात विसर्जन करण्याबाबत एक सकारात्मक चर्चा झाली. काकोडकर समितीचा अहवाल, राष्ट्रीय हरित लवादाची मार्गदर्शक सूचना आणि गणेशोत्सवाची प्रथा परंपरा, विसर्जनाची पध्दती याचा विचार करुन एक सर्वंकष धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती मंत्री शेलार यांनी दिली.


सरकार मुर्तीकारांच्या खंबीर पाठीशी
मुंबईच्या गणेशोत्सवाची प्रथा परंपरा आणि त्याचा एक समृद्ध इतिहास त्याच्याशी जोडलेली लोक भावना आणि जगभरात या उत्सवाची असलेली ख्याती याच्यात कोणतेही विघ्न न येता या सगळ्यात सकारात्मक तोडगा निघेल, सरकार पुर्णपणे सकारात्मक आहे, उत्सव आणि मुर्तीकारांच्या खंबीर पाठीशी आहे, असे मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.

Comments
Add Comment

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील

मुंबई विमानतळावर ७९ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : डीआरआय मुंबईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून या प्रकरणी दोन

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल