पनवेलमध्ये बालकाश्रमाजवळ बास्केटमध्ये बेवारस अवस्थेत आढळले अर्भक

पनवेल : तक्का परिसरातील स्वप्नालय नावाच्या संस्थेजवळ बास्केटमध्ये बेवारस अवस्थेत अर्भक आढळले. ही घटना शनिवार २८ जून २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास घडली. नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने अर्भक कोण सोडून गेले याचा तपास करत आहेत.

बास्केटमध्ये अर्भकाजवळ एक इंग्रजी भाषेत लिहिलेली चिठ्ठी होती. ही चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. बाळाचा सांभाळ करणे शक्य नसल्यामुळे त्याला असे सोडण्याचा निर्णय घेतल्याचे चिठ्ठीत नमूद आहे. बास्केटमध्ये बाळाजवळ सेरेलॅक तसेच बाळाचे कपडे पण ठेवलेले आढळले. चिठ्ठी लिहिणाऱ्या अज्ञात व्यक्तीने बाळाचा सांभाळ करण्यास आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे. बाळाची काळजी घ्या, भविष्यात शक्य झाल्यास बाळाला भेटेन, कृपया मला माफ करा; असेही चिठ्ठीत पुढे नमूद आहे.

अर्भकाला बास्केटमध्ये ठेवून ते बास्केट बेवारस अवस्थेत कोण आणि किती वाजता सोडून गेले हे अद्याप समजलेले नाही. परिसरातील सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने पोलीस तपास करत आहेत. डॉक्टरांनी तपासणी करुन बाळाची तब्येत स्थिर असल्याची माहिती दिली. सध्या पोलीस प्रशासनाच्या देखरेखीत बाळ सुरक्षित आहे.

पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवला असून बाळाच्या पालकांचा शोध सुरू आहे.
Comments
Add Comment

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

गावची जमीन गावातच, मोरवणे ग्रामसभेच्या ठरावाची सर्वत्र चर्चा

रत्नागिरी : कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण तालुक्यातील मोरवणे गावाच्या ग्रामसभेने एक ठराव केला आहे.

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये