HDB Financial Services IPO GMP: HDB ने रचला नवा इतिहास चार वर्षांतील सर्वाधिक सबस्क्रिप्शन कंपनीने मिळवले 'या' दराने सुरू आहे GMP

  219

प्रतिनिधी: एचडीबी फायनांंशियल सर्विसेस (HDB Financial Services Private Limited) या एनबीएफसी कंपनीच्या आयपीओने नवा इतिहास रचला आहे. या आयपीओ आपले बहुमोल आकड्यांतून स्पष्ट केले आहे. या आयपीओला (IPO) चार वर्षांतील सर्वाधिक सबस्क्रिप्शन गुंतवणूकदारांकडून मिळाले आहे. माहितीनुसार,एकूण आयपीओतील १७ पटीने सबस्क्रिप्शन कंपनीधे मिळवले ज्याचे मूल्यांकन १.६ लाख कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. बिडिंगपूर्वी या आयपीओने ३३६९ कोटी रूपये केवळ अँकर गुंतवणूकदारांकडून (Anchor Investors) यांच्याकडून प्राप्त केले होते.

एचडीएफसी बँकेच्या समुहाशी संलग्न असलेल्या या विना बँक वित्तीय संस्थेचा (NBFC) जलवा बाजारात पहायला मिळाला. एकूण १२५०० कोटींच्या आयपीओला तुंबळ प्रतिसाद मिळाल्याने या आयपीओतील समभागावर मूळ निश्चित (Issue Price) किमतीपेक्षा ८% प्रिमियम दरात हा समभाग विकला जात आहे. बाजार अभ्यासकांचा मते, हा शेअर ५४ रूपये प्रति समभाग विकला जात आहे. म्हणजेच जवळपास ७४० रूपयांच्या मूळ किंमतीपेक्षा अधिक दराने (७९४ रूपये) विकला जात आहे. वाढलेल्या मागणीमुळे कंपनीच्या ग्रे मार्केटमध्ये (Grey Market Price GMP) हा शेअर ८% अधिक दराने ग्राहक विकत आहेत.

एचडीएफसी बँकेचा स्वतः चे ९४% भागभांडवल हिस्सा आयपीओपूर्वी होता. आयपीओनंतर ते घटून ७४.१९% भागभांडवल (Stake) होऊ शकतो. कंपनीने आयपीओसाठी ७०० ते ७४० रूपये प्रति समभाग प्राईज बँड (Price Band) निश्चित केला होता. ३० तारखेला कंपनीच्या समभागांची अंतिम वाटप अपेक्षित आहे. कंपनीने एकूण १७.६५ पटीने सबस्क्रिप्शन मिळवले आहे ज्यामध्ये १.५१ पटीने किरकोळ गुंतवणूकदारांनी (Retail Investors), तसेच पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार (QIB) यांनी ५८.६४ वाटा, १०.५५ वाटा विना संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) यांनी सबस्क्राईब केला होता.

कंपनीच्या आयपीओला जोरात प्रतिसाद मिळाल्याने आगामी काळात हा मोठ्या प्रिमियम दराने बाजारात सूचीबद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बहुतांश बाजार विश्लेषकांनी हा आयपीओ दिर्घकालीन गुंतवणूकीसाठी सबस्क्राईब करण्याचा सल्ला दिला होता. कंपनी मुख्यतः आर्थिक सेवा, सुविधा तसेच ग्राहकांना कर्जपुरवठा करते. २ जुलैला हा शेअर बाजारात सूचीबद्ध (Listed) होणार आहे. मात्र आगामी काळात ३० हून अधिक आयपीओ बाजारात येण्याची शक्यता असल्याने आयपीओला सुगीचा काळ दिसत आहे. मात्र आतापर्यंत इतर निवडक आयपीओला चांगला प्रतिसाद मिळत असताना एचडीबीने नवा इतिहास रचत चार वर्षांत मोठी मजल मारली आहे. विशेषतः मुख्य प्रवाहातील आयपीओ (Mainstream IPO) असल्याने आयपीओ बाजारात बळकटी येऊ शकते.
Comments
Add Comment

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना

Senior Citizen Suicide: ८६ वर्षीय आजोबांची आत्महत्या! सुसाइड नोटमध्ये लिहिले...

नेरळ मधील तलावात ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या करत संपवले जीवन नेरळ: आयुष्याला कंटाळून एका वृद्ध व्यक्तीने नेरळ