दिलासादायक! मुंबईत कोविड शून्य रुग्ण नोंद

कोविड सदृश्य अथवा तत्सम लक्षणे आढळल्यास कृपया योग्य ती काळजी घ्यावी : बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन


मुंबई : मुंबईत कोविड- १९ विषाणू बाधित एकही रुग्ण शुक्रवारी आढळलेला नाही. त्यामुळे मुंबईकरांसाठी तसेच मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेसाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे. असे असले तरी, सर्व नागरिकांनी कोविड सदृश्य अथवा तत्सम लक्षणे आढळल्यास योग्य ती काळजी घ्यावी. वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने वेळीच उपचार घ्यावेत, असे नम्र आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.


कोविड हा विषाणूजन्य आजार आहे. सद्यस्थितीत मुंबई शहर व उपनगरामध्ये अधूनमधून कोविड विषाणू संसर्ग बाधित रुग्ण मागील २ महिन्यांपासून आढळून येत आहे. तसेच महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये कोविड बाधित रुग्ण आढळून येतात. मुंबईमध्ये कोविडचे रुग्ण 'पॉझिटिव्ह' आल्यानंतर नियमित उपचार केले जात आहेत. मागील काही आठवड्यांपासून कोविड बाधित रुग्णसंख्येत आढळणारी घसरण आणि शुक्रवारी २७ जून २०२५ रोजी शून्य रुग्णनोंद ही मुंबईतील आरोग्य यंत्रणेसाठी आणि नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची व सकारात्मक बाब ठरली आहे.


शुक्रवारी २७ जून २०२५ रोजी मुंबईत एकही नवीन कोविड-१९ बाधित रुग्णाची नोंद झालेली नाही.(आजची रुग्णसंख्या: शून्य).



जून महिन्यातील साप्ताहिक रुग्णसंख्येचा तपशील:



  • पहिला आठवडा (दिनांक २ ते ८ जून): २०२ रुग्ण

  • दुसरा आठवडा (दिनांक ९ ते १५ जून): १८६ रुग्ण

  • तिसरा आठवडा (दिनांक १६ ते २२ जून): ९९ रुग्ण

  • चौथा आठवडा (दिनांक २३ ते २९ जून): ३० रुग्ण


जून महिन्यातील साप्ताहिक रुग्णसंख्येचा तपशील:



  • पहिला आठवडा (दिनांक २ ते ८ जून): २०२ रुग्ण

  • दुसरा आठवडा (दिनांक ९ ते १५ जून): १८६ रुग्ण

  • तिसरा आठवडा (दिनांक १६ ते २२ जून): ९९ रुग्ण

  • चौथा आठवडा (दिनांक २३ ते २९ जून): ३० रुग्ण

  • जानेवारी ते एप्रिल २०२५ पर्यंत ६ रुग्ण,

  •  मेमध्ये ४३५ रुग्ण

  •  जूनमध्ये ५३९ रुग्ण याप्रमाणे नोंद झाली आहे.


(पैकी फक्त ६२ रुग्ण सक्रिय आहेत. त्यांना अतिसौम्य लक्षणे आहेत.)



‘व्होल जीनोम सिक्वेन्सिंग’



  • मुंबई महानगरपालिकेतर्फे ‘जीनोम सिक्वेन्सिंग' करिता पाठविण्यात आलेल्या १९ कोविड नमुन्यांच्या तपासणी अहवालानुसार, मुंबईत अद्याप कोणताही नवीन किंवा चिंताजनक विषाणू प्रकार (Variant of Concern) आढळून आलेला नाही.

  •  इन्फ्लुएंजा सदृश व श्वसनाचा तीव्र संसर्ग / दाह असलेले रुग्ण तसेच कोविड सदृश लक्षणे आढळल्यास त्वरित महानगरपालिका दवाखाना, रुग्णालय किंवा कुटुंबाचे वैद्यकीय तज्ज्ञ (फॅमिली डॉक्टर) यांचा कृपया सल्ला घ्यावा.

Comments
Add Comment

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील