मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW) या संस्थेची नवी धुरा आयपीएस अधिकारी पराग जैन यांच्याकडे सोपवली गेली आहे. १९८९ बँचचे अधिकारी पराग जैन हे ३० जून २०२५ पासून नवा पदभार स्विकारणार आहेत.


रवी सिन्हा यांच्याबदली आता जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रवी सिन्हा यांचा कार्यकाळ ३० जूनला संपत आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षांसाठी जैन यांची नियुक्ती सरकारने केली आहे. पराग जैन यांनी ऑपरेशन सिंदूर मध्ये बौद्धिक क्षमतेचा आधारे गुप्त माहिती गोळा केली होती. त्यांच्या या कामगिरीनंतर आता रॉ ची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे. त्यांनी देशाच्या विविध पातळीवरील सुरक्षा यंत्रणेत काम केले आहे. त्यांचा प्रदिर्घ अनुभव पाहता त्यांची या पदावर वर्णी लागली आहे.


सध्या पराग जैन हे एव्हिएशन रिसर्च सेंटरचे मुख्य आहेत. मोदी सरकारने त्यांची वर्णी लावली असल्याने सध्याच्या क्लिष्ट जागतिक वातावरणाचे आव्हान त्यांच्यासमोर उभे आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जैन यांनी कॅनडा मधील खलिस्तानी कारवायांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते. तसेच जम्मू काश्मीर येथे कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यास प्रयत्न केले होते.

Comments
Add Comment

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या

सीमा सुरक्षा दल राबवणार 'ऑपरेशन सर्द हवा', घुसखोरांना दिसताक्षणी ठार करणार

श्रीनगर : सीमा सुरक्षा दल (Border Security Force / BSF) सीमेवर जम्मू काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सर्द हवा' आणि राजस्थानमध्ये 'ऑपरेशन कोल्ड

आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी

दिल्लीमधील सरकारने दिले आदेश नवी दिल्ली : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे देशातील अनेक शहरांमधील लोक त्रस्त

काश्मिर खोरं गोठलं! तापमानात विक्रमी घसरण

श्रीनगर: हिवाळ्यात अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात. गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी डिसेंबर

गुजरात एटीएसची छापेमारी! राजस्थानातून जप्त केले २२ किलो ड्रग्ज

राजस्थान: राजस्थानमधून ड्रग्ज तस्करीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील भिवाडी इथे गुजरात