"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार पडला, ज्यात भारताला इंग्लंडकडून ५ गडी राखून पराभव पत्करावा लागला. आता दुसरा कसोटी सामना बर्मिंगहॅममध्ये २ ते ७ जुलै दरम्यान खेळवला जाणार आहे. याचदरम्यान, भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि त्याची पत्नी संजना गणेशन यांच्यातील एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये संजनाने बुमराहची थेट फिरकी घेतली आहे.


२०२१ मध्ये जसप्रीत बुमराह आणि टीव्ही प्रेझेंटर संजना गणेशन विवाहबंधनात अडकले. त्यांना अंगद नावाचा एक मुलगा देखील आहे. दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. जेव्हा संजना भारतातील कोणत्याही मालिकेचे कव्हरिंग करत असते, तेव्हा ती अनेकदा बुमराहची मुलाखत घेताना दिसते. आता त्यांचा 'हू इज द बॉस' या शोमधील एक व्हिडिओ चर्चेत आला आहे.





हरभजन सिंग आणि त्याची पत्नी गीता बसरा यांच्या 'हू इज द बॉस' या शोमध्ये जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांनी हजेरी लावली होती. या शोमध्ये बोलताना संजनाने एक मजेदार किस्सा सांगितला, जो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लग्नाबद्दल बोलताना संजना म्हणाली, "जसप्रीत म्हणाला चला पळून जाऊया, म्हणून मी त्याला म्हणाले, 'तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील?'" संजनाच्या या वक्तव्याने बुमराहची बोलती बंद झाली आणि यावर उपस्थित सर्वजण हसले.


सध्या भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. लीड्समध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत भारताला ५ विकेट्सनी पराभव पत्करावा लागला, तरी जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात चांगली गोलंदाजी केली. भारतीय गोलंदाजीचा बराचसा भार बुमराहवर अवलंबून आहे. दरम्यान, वर्कलोड व्यवस्थापनामुळे बुमराह पुढील कसोटी सामना खेळणार नाही, अशी चर्चा आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, बुमराह या दौऱ्यात फक्त ३ कसोटी सामने खेळणार आहे.

Comments
Add Comment

IND vs PAK : पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील संघर्ष हा जगातील सर

भारताची बॉक्सर जॅस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले सुवर्णपदक, रचला इतिहास

नवी दिल्ली: भारताची प्रतिभावान बॉक्सर जैस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५

BCCI च्या कुटुंबातील कोणीही मेलं नाही, म्हणून..., शुभम द्विवेदीच्या पत्नीची प्रतिक्रिया

"सामान्य लोक माझं ऐकतील आणि सामन्यावर बहिष्कार टाकतील" ऐशन्या द्विवेदी Asia Cup 2025 India Vs Pak Match Controversy: पहलगाम हल्ल्यात

भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई

क्रिकेटमध्ये पाकिस्तानशी तर हॉकीमध्ये चीनशी... रविवारी भारताची दुहेरी 'कसोटी'!

उद्याचा रविवार क्रीडाप्रेमींसाठी दुहेरी थरार, हॉकी आणि क्रिकेटचे दोन्ही सामने महत्वाचे! नवी दिल्ली: उद्या दि. १४

जर्सीचे प्रायोजक १५-२० दिवसांत निश्चित होणार: राजीव शुक्ला

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट जर्सीला प्रायोजक मिळण्यासाठी आणखी २ ते ३ आठवड्यांची वाट पाहवी लागणार आहे, असे