Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

  183

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू


नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये बांधकाम व्यवसायिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. नाशिकचे प्रसिद्ध उद्योजक सुनील हेकरे यांचा अपघातात मृत्यू झाला असून, त्यांची पत्नी व दोन मुलं गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे हेकरे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सुनील हेकरे आणि त्यांचे कुटुंबीय मुंबईहून नाशिककडे आलिशान मर्सिडीज गाडीतून प्रवास करत होते. मात्र, समृद्धी महामार्गावर इगतपुरी बोगद्याच्या पुढे शहापूर हद्दीत त्यांच्या गाडीला अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, गाडीने ३ वेळा पलटी मारली आणि सुनील हेकरे हे गाडीतून बाहेर फेकले गेले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आणि प्रचंड रक्तस्रावामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.





वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली नाही


सुनील हेकरे यांचे बंधू अनिल हेकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर अपघाताच्या ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे गाडीचा ताबा सुटून अपघात झाला. "महामार्गावरील बांधकामाची गुणवत्ता निकृष्ट असून, अपघातानंतर वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली नाही," असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.



उद्घाटनाच्या महिन्याभरातच अपघातांची मालिका


दरम्यान, समृद्धी महामार्गावरील इगतपुरी-आमणे या ७६ किमी लांबीच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत समृद्धी महामार्गावर अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. या महामार्गावर दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे हा नवा मार्ग हा अपघाती मार्ग ठरतोय का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. मागील आठवड्यात कसारा-शहापूर तालुक्यातील वाशिंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर क्रुझर जीप आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू तर सात जण जखमी झाले होते. ही दुर्घटना वाशिंद आणि आमने दरम्यान घडली होती.

Comments
Add Comment

पुण्यात बोर्ड काढण्यावरून वाद , तरुणावर कोयत्याने वार; काँग्रेसच्या माजी नेत्यावर गुन्हा दाखल

पुणे : पुण्यात गुन्हेगारीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे . कधी खून, मारामाऱ्या, दरोडे, लुटमार , तर कधी कोयता गँग

नागपूर - पुणे वंदे भारत या दिवसापासून धावणार

नागपूर : नागपूर (अजनी) ते पुणे आणि पुणे ते नागपूर (अजनी) अशी वंदे भारत एक्सप्रेस रविवार १० ऑगस्ट २०२५ पासून धावणार

एसटी महामंडळाच्या राखी पौर्णिमेसाठी ४० जादा गाड्या कार्यरत

लाडक्या बहिणींसाठी ८, ९ आणि ११ ऑगस्ट रोजी बसची विशेष सेवा पेण(स्वप्नील पाटील) : आधीच लाडक्या बहिणींना एसटी

राज्यातील ५ ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांसाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

नियमितपणे आढावा, समन्वय साधणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई : राज्यातील पाच

माधुरी लवकरच कोल्हापूरला परतणार!

कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश; माधुरीला परत पाठवण्याबाबत वनताराकडून आश्वासन कोल्हापूर: कोल्हापूरकरांच्या

उत्तराखंडमधील ढगफुटीत अडकले महाराष्ट्रातील ५१ पर्यटक

सर्व पर्यटक सुखरूप असल्याची राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती मुंबई : उत्तराखंडमधील राज्यातील उत्तरकाशी