झिशान सिद्दीकी यांच्यावर पाळत ठेवणाऱ्या संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन सोडले

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते झिशान सिद्दीकी यांच्यावर गेल्या चार दिवसांपासून दोन अज्ञात व्यक्ति पाळत ठेवत होते. या प्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले होते, परंतु चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले आहे.



झिशान सिद्दीकी यांच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले की दोन व्यक्ति गेल्या चार दिवसांपासून त्यांचा पाठलाग करत आहेत. या संशयास्पद हालचालींची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली, ज्यानंतर निर्मल नगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्या दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेतले.


पोलिसांनी रात्रभर या दोन्ही व्यक्तींची कसून चौकशी केली. तसेच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी देखील या प्रकरणाची तपासणी केली. परंतु चौकशीत कोणतीही संशयास्पद बाब समोर आली नाही आणि त्यांच्याकडून कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही.


झिशान सिद्दीकी हे प्रसिद्ध राजकीय नेते बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आहेत. गेल्या वर्षी बाबा सिद्दीकी यांची गोळीबारात हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर झिशान सिद्दीकी यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यावर पाळत ठेवल्याच्या बातमीने मोठी खळबळ उडाली होती.

Comments
Add Comment

कांदिवलीत उंच इमारतीला आग; आठ जणांना वाचवले

मुंबई : रविवारी सकाळी कांदिवली (पश्चिम) येथील अग्रवाल रेसिडेन्सी या उंच इमारतीत लागलेल्या आगीने परिसरात खळबळ

MPSC 2026 चे वेळापत्रक जाहीर, सविस्तर वाचा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, गुंदवलीवरून थेट गाठता येणार मिरा रोड

मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या गुंदवलीवरून निघालेली मेट्रो दहिसर पूर्व

देशामध्ये २२ बनावट विद्यापीठे

‘यूजीसी’ने जाहीर केली यादी मुंबई  : मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास