ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या वर्षभरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एकूण ३ लाख ७५ हजार रुपये दंड वसूल केला. एसटीच्या १६ आगारातून ही कारवाई करण्यात आली असून विना तिकिट प्रवास करणाऱ्यांची एकूण संख्या ३१९ इतकी आहे. अशी माहिती समोर आली.


विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कशा प्रकारे दंड आकरण्यात येतो 


विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई म्हणून तिकिटाच्या रकमेबरोबरच त्याच्या दुप्पट दंडाची रक्कम वसूल केली जाते. त्यावर १८ टक्के जीएसटी लावण्यात येतो. जर प्रवाशांकडे सामान असल्यास स्वतंत्रपणे शुल्क आकारण्यात येतो


२०२४ –२५ मध्ये परिवहन विभागीय कार्यालय पुणे यांच्याकडून वसूल करण्यात आलेली दंडात्मक कारवाई


भाडे वसूली ४६,५५० रुपये,
दंड ८३,१८७ रुपये
इतर वसूली २,१०,४९७ रुपये
एकूण ३,४०,२३४ रुपये


राज्य सरकारने एसटी प्रवाशांनकरीता परवडणारे दर ठेवलेले आहेत. त्यामुळे एसटीचे तिकिट काढूनच प्रवास करावा, एसटी विभागाला प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन विभाग नियंञक,पुणे एसटी विभाग अधिकारी अरुण सिया यांनी केले आहे. तसेच एसटी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तिकिट तपासणी आता नियमीत केली जाणार असून त्यात बदल केले जाणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे यांनी दिली. त्यामुळे सर्व प्रवाशांनी एसटी विभागाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांच्यावतीने करण्यात आले. एसटी महामंडळाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचल्याची माहिती एसटी महामंडळ आधिकाऱ्यांनी दिली. तसेच प्रताप सरनाईक सविस्तर श्वेतपत्रिका काढणार आहेत. त्यात एसटी महामंडळाला किती फायदा आणि नुकसान झाले याची माहिती असणार आहे.


Comments
Add Comment

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड