Tata Hospital : भारतात टाटा रुग्णालयामध्ये प्रथमच एमआयबीजी पद्धतीचा वापर, न्यूरोब्लास्टोमा रुग्णाचा जीव वाचला...


मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून न्यूरोब्लास्टोमा (Neuroblastoma) कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होतं आहे. यापूर्वी अनेक रुग्णांना या आजारामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.  मुंबईतील प्रसिद्ध असलेले टाटा रुग्णालयात १७ वर्षाच्या मुलाला न्यूरोब्लास्टोमा कर्करोग (Neuroblastoma cancer) आजाराने ग्रासलेले होते. त्यामुळे टाटा रुग्णालयात गेले अनेक महिन्यांपासून रुग्ण उपचार घेत होता. त्यामुळे टाटा रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णाला एमआयबीजी इंजेक्शन देऊन मुलाचे प्राण वाचवून नवीन आयुष्य दिले. अशा प्रकारचे एमआयबीजी इंजेक्शनचा वापर करुन रुग्णांवर उपचार करण्याची हि पहिलीच घटना आहे.


न्यूरोब्लास्टोमा आजार असलेल्या रुग्णांवर केमोथेरपी, (Chemotherapy) शस्त्रक्रिया, ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण, रेडिओथेरपी, ॲण्टी जीडी २ इम्युनोथेरपी आणि डिफरेंशीएशन उपचार केले जातात.  अशा रुग्णांवर ॲण्टी जीडी २ इम्युनोथेरपीचा वापर करुन उपचार केले जातात. परंतू हि उपचार पद्धती खुपच खर्चीक असल्याने ती रुग्णांना परवडत नाही. त्यामुळे न्यूरोब्लास्टोमा कर्करेाग असलेल्या रुग्णांवर एमआयबीजी पद्धतीने उपचार केले जातात.


न्यूरोब्लास्टोमा आजार असलेल्या रुग्णांना एमआयबीजी इंजेक्शन (MIBG injection) दिल्यानंतर गॅमा किरण उत्सर्जित होतात. या रेडिएशनच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीवर त्याचा परिणाम देखील होतो. त्यामुळे योग्य काळजी घेणे आवश्यक असते. एमआयबीजी इंजेक्शन रुग्णाला दिल्यानंतर रुग्णांना विशेष विलगीकरण कक्षात ठेवले जाते.  भारतात एमआयबीजी इंजेक्शनचा वापर ३०० मिलीक्युरीज मध्ये वापरण्याची परवानगी आहे. परंतू इंजेक्शनाची उच्च मात्रात वापर करुन रुग्णांवर उपचार केले जातात, त्यामुळे रुग्णही बरे झाल्याचे आढळून आले आहेत.


भारतामध्येही न्यरोब्लास्टोमा रुग्णांना एमआयबीजी इंजेक्शनची उच्च मात्रा देण्याचा निर्णय टाटा रुग्णालयाने (Tata Hospital) घेतला. न्यूरोब्लास्टोमा झालेल्या १७ वर्षीय रुग्णाला ५ मे रोजी ४०० मिलिक्युरीज मात्रा असलेली दोन एमआयबीजीची इंजेक्शन देण्यात आली. त्यानंतर त्याला विशेष विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. त्यानंतर पाच दिवसांनी रुग्णाला रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. डॉक्टरांच्या अपेक्षेनुसार इंजेक्शन दिल्यानंतर २१ दिवसांनी त्याच्या शरीरातील स्टेम सेल्स कमी झाल्याने २४ व्या दिवशी त्याला ऑटोलॉगस हेमॅटोपोएटिक स्टेम सेल्स देण्यात आले. त्यानंतर मुलाच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यामुळे टाटा रुग्णालयाचे संचालक डॉक्टर सुदीप गुप्ता यांनी भारतामध्ये एमआयबीजी इंजेक्शनाची पद्धत यशस्वी झाली आहे. असे सांगितले



Comments
Add Comment

अरबी शिकवणाऱ्या व्यक्तीवर अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई: अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याच्या गंभीर आरोपाखाली मुंबई पोलिसांनी शिवडी येथील एका धार्मिक संस्थेतून

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर सोयी-सुविधांची कमतरता नको!

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे निर्देश मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा

डिसेंबर २०२८ नंतर सिग्नल फ्री आणि वाहतूक कोंडीशिवाय होणार प्रवास, महापालिकेच्या या प्रकल्पाची वाढतेय गती

मुंबई (खास प्रतिनिधी) : दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंडदरम्‍यान नवीन जोडमार्ग स्‍थापित होत आहे. पश्चिमेकडील

मुंबईत चार नवीन कबूतर खाने, पण बाकीचे बंद म्हणजे बंदच....

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील विद्यमान कबुतरखाने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले आहेत. दरम्यान,

पवईतील एन्काऊंटरवर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा काय म्हणाले ?

मुंबई : पवईतील स्टुडिओत घडलेल्या ओलीस नाट्य आणि त्यानंतर झालेले आरोपी रोहित आर्य याच्या एन्काऊंटरवर अनेक प्रश्न

'वाचाळवीर' राऊतांना सक्तीची विश्रांती? महापालिका निवडणुकीपूर्वी ‘राजकीय ब्रेक’

प्रकृतीच्या कारणामुळे संजय राऊत दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार; राजकीय वर्तुळात अनेक