Mayasheel Ventures: मायाशील वेंचर्सचे बाजारात जोरदार पदार्पण 'इतक्या' किंमतीवर शेअर झाला Listed

प्रतिनिधी: मायाशील वेंचर्स (Mayasheel Ventures) कंपनी आजपासून बाजारात सूचीबद्ध झाली आहे. त्यामुळे आज कंपनीचा पहिला दिवसच जोरदार तेजी घेऊन आला.आयपीओनंतर सूचीबद्ध झालेल्या कंपनीच्या समभाग (Shares) ने सकाळीच पदार्पण करताना ५८ रूपयांची उसळी घेतली आहे. आयपीओतील मूळ ४७ रूपये (Issue Price) तुलनेत ५८ रूपयांवर हा प्रथम ट्रेडिंगमध्ये सूचीबद्ध झाला. परिणामी या शेअर बाजारात २३.४०% उसळी घेतल्यानंतर बाजारात या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना रस असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.

एनएसई एसएमई (NSE SME) या प्रवर्गात ही कंपनी सूचीबद्ध झाली होती. रिपोर्टनुसार या कंपनीचा आयपीओ एकूण २३२.७३ पटीने सबस्क्राईब झाला होता. ज्यामध्ये १०२.६३ वेळा किरकोळ गुंतवणूकदारांनी (Retail Investors), पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार (QIB) यांनी ९८.१४ वेळा,विना संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) यांनी ७१५.७५ वेळा आयपीओ वाटा सबस्क्राईब केला होता. आज आयपीओ सूचीबद्ध होताना बिडिंग मागणीत वाढ झाल्याने ही तेजी पहायला मिळत आहे.२७.२८ कोटींचा हा आयपीओ २४ ते २६ जून कालावधीत बाजारात दाखल झाला होता. २.२५ कोटींचे इक्विटी समभाग ऑफर फॉर सेल (OFS) या प्रवर्गास विक्रीसाठी उपलब्ध होते. किरकोळ गुंतवणूकदारांना कमीत कमी १.४१ लाख समभागांची (Share) गुंतवणूक अनिवार्य होती. १९ जूनला कंपनीने आयपीओतून ७.७६ कोटींची गुंतवणूक अँकर गुंतवणूकदारांकडून प्राप्त केली होती. Narolina Financial Services Private limited कंपनी आयपीओसाठी (IPO) बुक लिडिंग मॅनेजर (Book Leading Manager) होती. तर Maashitla Securities Private Limited कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार (Registrar) म्हणून काम पाहणार होती.

२००८ साली स्थापन झालेली ही कंपनी रस्ते व पायाभूत सुविधा (Infrastructure) क्षेत्रात कार्यरत आहे. आयपीओसाठी कंपनीने ४७ रूपये प्रति समभाग प्राईज बँड (Price Band) निश्चित केला होता.
Comments
Add Comment

मराठी चित्रपटात झळकणार सलमान आणि संजूबाबा; कोणती भूमिका करणार, पहा...

मुंबई : बॉलीवूड क्षेत्र गाजवणारा सलमान खान आता लवकरच मराठी सिनेमांमध्येही दिसणार आहे. सलमान खानच्या मराठी

पिझ्झा हटची पालक कंपनीचा 'यम' ब्रँड लवकरच विक्रीस?

प्रतिनिधी:पिझ्झा हट लवकरच विकला जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पिझ्झा हटची

धक्कादायक! पत्नीचे नाक कापले आणि प्राण्यांनी ते खाल्ले, मध्यप्रदेशमधील घटना

मध्यप्रदेश: पतीने आपल्या पत्नीचे नाक कापले आणि नंतर हे नाक जनावराने खाल्ले अशी धक्कादायक घटना मध्य प्रदेशच्या

मी झोपलेली असताना तो माझ्या खोलीत आला... फराहने सांगितला तो किस्सा!

मुंबई : काजोल आणि ट्विंकल खन्ना यांच्या 'टू मच' या चॅट शोमध्ये अभिनेत्री अनन्या पांडेसह फराह खानने हजेरी लावली

Stocks to Buy Today: मोतीलाल ओसवालकडून चांगल्या रिटर्न्ससाठी 'हे' तीन शेअर खरेदी करण्याचा सल्ला

प्रतिनिधी: मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने काही शेअर आज खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जाणून घ्या शेअरची

कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेत अभियंत्यांसह विविध ३०० जागा…

नाशिक  : वाढती लोकसंख्या आणि कमी होणारे मनुष्यबळ यांना तोंड देणाऱ्या नाशिक महापालिकेत स्थापत्य, यांत्रिकी,