रेल्वे स्थानकावर भीक मागणाऱ्या मुलीचा शारीरिक सुखासाठी वापर अन् खाडीत आढळला मृतदेह! डोंबिवलीतील धक्कादायक घटना उघड

ठाणे : डोंबिवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील पलावा सिटीसमोरील खाडीमध्ये तीन दिवसांपूर्वी एका मोठ्या सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह आढळला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा अवघ्या २४ तासांमध्ये तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या. तरुणीचा प्रियकर श्रीनिवास विश्वकर्माने तिची हत्या केल्याचे तपासात उघड झाले.


मृत तरुणी सुरुवातीला रेल्वे प्लेटफॅार्मवर भिक मागायची. मात्र ⁠५ वर्षांपूर्वी श्रीनिवास विश्वकर्मा तिला आपल्या घरी राहण्यासाठी घेवून आला होता. कधी बहीण, कधी मुलगी तर कधी बायको म्हणून श्रीनिवास तिची ओळख लोकांना सांगायचा. ⁠पण तो तिच्यावर सारखे लैंगिक अत्याचार करायचा. हत्या झाली तेव्हा तरुणी ४ महिन्यांची गर्भवती होती. तरीही आरोपी तिच्यावर जबरदस्ती करत होता. यावेळी तरुणीने नकार दिल्यामुळे आरोपीने गळा आवळून हत्या केली.




या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पलावा सिटीसमोरील खाडी परिसरातील सगळे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. यामध्ये एक व्यक्ती खाडीच्या दिशेने सुटकेस घेऊन जात असल्याचे आढळले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शिळडायघर पोलिसांनी २४ तासात प्रकरण उघडकीस आणले. ⁠वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ आणि पीआय राजपूत यांच्या टीमने २४ तासांत आरोपी श्रीनिवास विश्वकर्मा याला उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथून अटक केली आहे.


Comments
Add Comment

Deep Amavasya : दीप अमावस्येला कशी करावी दिव्यांची पूजा ? सविस्तर जाणून घ्या...

मुंबई : हिंदू पुराणानुसार, आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 'दीप अमावस्येला' घरातील सर्व दिव्यांची पूजा

Best Outfits For Beach Trip : समुद्रकिनारी स्टायलिश आणि कम्फर्टेबल दिसण्यासाठी ‘हे’ आउटफिट्स नक्की ट्राय करा

मुंबई : समुद्रकिनारी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर कपड्यांची निवडही तितकीच महत्त्वाची ठरते. बीचवर उन्हं,

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट

Jalgaon : भंगार विक्रीतून मध्य रेल्वे मालामाल, भुसावळ विभाग ३३ कोटींच्या महसुलासह दुसऱ्या क्रमांकावर

Jalgaon : आजपर्यंत आपण तिकीट विक्री किंवा तिकीट तपासणी मधून रेल्वे विभागाने (Central Railway) कोटींची कमाई केल्याचे ऐकले असेल,

Empty Stomach Food : सकाळी रिकाम्या पोटी नक्की काय खावं अन् काय टाळावं? 'या' एका चुकीमुळे बिघडू शकतं तुमचं पचनतंत्र!

रिकाम्या पोटी प्रत्येकासाठी एकच पदार्थ योग्य असेल असे नाही. तुमची पचनशक्ती, अॅसिडिटी आणि इतर आरोग्यविषयक

Dombivli Barvi Dam : कल्याण - डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी, बारवी धरण ९९.८८ टक्के भरले

डोंबिवली : कल्याण - डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील मोठ्या भागाची तहान भागविणारे बारवी धरण ९९.८८