जिओमध्ये गुंतवणूक ही माझ्या आयुष्यातली मोठी रिस्क : मुकेश अंबानी

रिलायन्स आता डीप-टेक, अ‍ॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बनण्याच्या मार्गावर


मुंबई  : टेलिकॉम क्षेत्रातील ‘जिओ’मध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणे हे त्यांच्या कारकिर्दीतील “सर्वात मोठे धाडस” होते, असे मत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी व्यक्त केले. त्या काळात भारत इतक्या प्रगत डिजिटल तंत्रज्ञानासाठी तयार नाही. तसेच अनेक विश्लेषकांना या योजनेच्या यशाबाबत शंका होती, असेही त्यांनी मुलाखतीत स्पष्ट केले.


“जिओमध्ये केलेली गुंतवणूक अपेक्षित परतावा देऊ शकली नसती, तरीसुद्धा ती भारताच्या डिजिटायझेशनच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल ठरली असती,” असेही अंबानी यांनी सांगितले. रिलायन्स जिओमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेणे फार सोपे नव्हते. “त्या काळात आम्ही आमच्याच पैशाने गुंतवणूक करत होतो आणि मी स्वतः प्रमुख शेअरहोल्डर होतो. आम्ही मोठे धोके पत्करले कारण आमच्यासाठी ‘स्केल’ महत्वाचा होता आणि आमची ध्येयंही खूप मोठी होती., असे म्हणाले.


५ जी तंत्रज्ञानाबाबत बोलताना अंबानी म्हणाले, “जिओचे ५जी तंत्रज्ञान पूर्णपणे इन-हाउस म्हणजेच आमच्या स्वतःच्या प्रयत्नांतून विकसित केले आहे. कोअर, हार्डवेअर, सॉफ्टवेअर सर्व घटक आम्ही स्वतः तयार केले. फक्त २० टक्के भागात आम्ही एरिक्सन आणि नोकिया यांना सामावून घेतले, जेणेकरून आमची प्रणाली जागतिक निकषांवर खरी ठरेल.


मी माझ्या टीमला सांगितले, ‘तुम्हाला यांच्यापेक्षा चांगले बनवायचे आहे.’ आणि त्यांनी ते करून दाखवले. आज आम्ही खरोखरच त्यांच्यापेक्षा पुढे आहोत.”
भविष्यातील योजना सांगताना अंबानी म्हणाले, “मी नेहमी म्हणत आलो आहे की आपल्याला केवळ तंत्रज्ञानाचे वापरकर्ते न राहता त्याचे मालक व्हायला हवे, इनोव्हेटर व्हायला हवे. रिलायन्स आज एका डीप-टेक आणि प्रगत उत्पादन कंपनीकडे वाटचाल करत आहे. दूरसंचार क्षेत्रातून आम्ही याची सुरुवात केली आहे.”

Comments
Add Comment

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी