Gold Silver Rate: सोने चांदी सलग चौथ्यांदा स्वस्त ! सोन्यात 'महाकाय ' घसरण चांदीच्या दरात किरकोळ घसरण 'ही' आहेत कारणे !

प्रतिनिधी:आज आंतरराष्ट्रीय तणावात घट झाल्यानंतर झपाट्याने सोन्याचांदीचे दर घसरले आहेत. इस्त्राईल व इराण यांच्यातील युद्धाविरामामुळे बाजारातील सोन्याच्या दरात गेल्या चार दिवसात मोठी घसरण झाली परिणामी आजही सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात गडगडले आहेत. 'गुडरिटर्न्स ' संकेतस्थळावरील माहितीनुसार २४ कॅरेट प्रति सोन्याच्या दरात ९३ रूपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे २४ कॅरेट प्रति ग्रॅम दर ९८०२ रूपयांवर गेले आहेत. २२ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत देखील ८५ रूपयांनी घसरली आहे. त्यामुळे २२ कॅरेट प्रति ग्रॅम दर ८९८५ रुपयांवर पोहोचले आहेत.


२४ कॅरेट प्रति तोळा किंमत ९३० रूपयांनी घसरत ९८०२० रूपये पातळीवर पोहोचली आहे तर २२ कॅरेट प्रति तोळा किंमत ८५० रूपयांनी घसरत ८९८५० रूपये पातळीवर पोहोचली आहे. १८ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ६९ रूपयांनी घसरत ७३५२ रूपयांवर पोहोचली आहे. तर १८ कॅरेट प्रति तोळा किंमत ६९० रूपयांनी घसरत ७३५२० रूपयांवर पोहोचली आहे.आज सराफाबाजारात सोन्यात अधिकच्या पुरवठ्यात झालेल्या वाढीतुलनेत मागणीत झाल्याने सोने स्वस्त झाले आहे.


किंबहुना ही आठवड्यातील सर्वात मोठी घसरण आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.८७% घसरण झाली होती. तर युएस गोल्ड स्पॉट दरात १.४३% घसरण झाली आहे.


भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समधील सोन्याच्या निर्देशांकात १.५४% घसरण झाली आहे परिणामी एमसीएक्स किंमत पातळी ९५५९०.०० पातळीवर गेली. अमेरिकन बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात उशीरा होण्याची शक्यता असल्याने बाजारातील डॉलरच्या सपोर्ट लेवलही घटली. डॉलरच्या तुलनेत रुपयाची वाढ झाल्याने तसेच मध्यपूर्वेकडील युद्धस्थिती आटोक्यात आल्यानंतर सोन्याची मागणी घटली. तसेच गुंतवणूकदारांचे लक्ष पुन्हा एकदा कच्च्या तेलाकडे केंद्रित झाल्यामुळे सोन्याच्या बरोबर चांदीच्या दरातही घसरण झाली आहे.


यूएस पर्सनल कन्झम्प्शन एक्सपेंडिचर (पीसीई PCE) किंमत निर्देशांक आज भारतीय प्रमाणवेळेनुसार उशिरा प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे आणि यानिमित्ताने फेडरल रिझर्व्ह (फेड) च्या दर कपातीच्या मार्गाबद्दल संकेत देईल. यामधून, यूएस डॉलर (यूएसडी) किंमत गतिमानतेवर प्रभाव पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल आणि सोन्याच्या नॉन-यिल्डिंग किमतीला काही अर्थपूर्ण चालना देईल.मात्र वेट अँड वॉचचा पवित्रा गुंतवणूकदारांनी घेतल्याने बाजारात धातूची किंमत खालावण्यास एकप्रकारे मदत निर्माण झाली आहे.

चांदीतही मोठी घसरण !

संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या दरात मात्र किरकोळ घसरण झाली आहे. चांदीच्या प्रति ग्रॅम दरात ०.१० रूपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति किलो चांदीचे दर १०० रूपयांनी घसरत १०७९०० पातळीवर पोहोचला. एमसी एक्सवरील चांदीच्या निर्देशांकात १.८३% घसरण झाल्याने किंमत पातळी १०४८००.०० रूपयांवर पोहोचली. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील चांदीच्या Silver Future Index या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत तब्बल २.०१% घसरण झाली आहे. सोन्यासोबतच चांदीचे दर घटण्याचे प्रमुख कारण म्हणजे इस्त्राईल व इराण यांच्यातील युद्धात सोन्याला महाग म्हणून चांदीचा पर्याय बघितला गेला होता. मात्र सोन्यातही युद्धबंदीनंतर मुबलकता आल्याने चांदीच्या मागणीतही घट झाली आहे. चांदीच्या औद्योगिक उत्पादनातही मागणीत घट झाल्याने चांदीचाही बाजार तुलनात्मकदृष्ट्या घसरला आहे.

Comments
Add Comment

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

संपलेल्या पक्षासोबत युती, तब्बल ८० जागा टाकणार झोळीत

उबाठा पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी, बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उबाठा आणि मनसेची युती

खासदार, आमदार, माजी आमदारांची आपल्या नातेवाईकांसाठी तिकीटाकरता फिल्डींग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुती आणि ठाकरे बंधूंची युतीची झालेली असून

माजी खासदार राहुल शेवाळेंची वहिनी थेट धारावीतून लढणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : शिवसेनेचे सरचिटणीस आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांची वहिनी वैशाली शेवाळे या

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक