अखेर कर्नाक पुलाला आता लोकार्पणाची प्रतीक्षा

बुधवारी रात्री उशिरापर्यंत पूल विभागाने फिरवला शेवटचा हात


मुंबई : मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि'मेलो मार्गाला जोडणारा कर्नाक उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून या पुलाचे लोकार्पण करण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेली रेल्वेचे ना हरकत प्रमाणपत्रही (एनओसी) प्राप्त झाली आहे. या पुलाच्या बांधकामावर शेवटचा हात प्रशासनाच्या वतीने फिरवण्यात आला आहे. त्यामुळे अखेर रेल्वेची एनओसी प्राप्त झाल्याने आता तरी वेळेत हे पूल वाहतुकीसाठी खुले होईल का असा सवाल उपस्थित केला जात आहे. दक्षिण मुंबईतील मशीद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे.


लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे.या पुलाचे बांधकाम आता पूर्ण झाले आहे. या पुलाचे बांधकाम प्रथम मे महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते, त्यानंतर ही कामे १० जूनपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यानुसार ही कामे पूर्ण झाल्यानंतरही लोकार्पणाच्या दृष्टिकोनातून रेल्वेचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यानुसार महापालिकेच्या पूल विभागाच्या वतीने रेल्वेकडे एनओसीसाठी पत्रव्यवहार करण्यात आला होता.


परंतु रेल्वेची एनओसी प्राप्त न झाल्याने या पुलाचे लोकार्पण लांबणीवर पडले होते. अखेर बुधवारी २५ जुन २०२५ रोजी संध्याकाळी या पुलासाठीची एनओसी प्राप्त झाली आहे. त्यामुळे आता पुलाच्या लोकार्पणाचा मार्ग खुला झाला असून विक्रोळीप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही उद्घटनाशिवाय या पुलाचे लोकार्पण करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला देता की यासाठीची वेळ देत स्वत: उद्घाटन करता याकडे सर्वाचे लक्ष आहे.


Comments
Add Comment

मोनोरेल, मेट्रो सेवांसाठीचा आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा...

जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्षांच्या दिल्या अशा सूचना मुंबई (खास प्रतिनिधी) : सार्वजनिक वाहतूक

जागतिक तणावाच्या काळात भारत जगासाठी दीपस्तंभाची भूमिका बजावेल!

मुंबईत पंतप्रधान मोदींचे जागतिक सीईओ फोरममध्ये प्रतिपादन मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवारी)

तुम्हाला वारंवार Spam कॉल येतात का? तर आता नो टेन्शन कारण...

आता अनोळखी नंबरसह मोबाईलवर दिसेल कॉल करणाऱ्याचं नाव मुंबई : दूरसंचार क्षेत्रात मोठा बदल होत

स्टारलिंकची भारतात एंट्री, मुंबईत होणार डेमो रन

मुंबई : एलॉन मस्क यांच्या मालकीची स्टारलिंक कंपनी भारतात सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. ३०

देशभरात १ नोव्हेंबरपासून आधार, बँकिंग व एलपीजीवर नवे नियम होतील लागू

मुंबई : देशभरात १ नोव्हेंबरपासून अनेक महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत, ज्यांचा थेट परिणाम सामान्यांच्या दैनंदिन

Bmc election 2025: प्रतिक्षा संपली,मुंबई महापालिकेच्या प्रभागांचे आरक्षण सोडत येत्या ११ नोव्हेंबरला...

मुंबई (खास प्रतिनिधी) : राज्यातील २८ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभाग आरक्षणाचा