मुंबई (प्रतिनिधी): पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त सहभागी होणाऱ्या यात्रेकरूंच्या सोयीसाठी मध्य रेल्वे १ जुलै ते १० जुलैपर्यंत पुणे ते मिरज, मिरज ते नागपूर आणि मिरज ते लातूर अशा ३ एकेरी आषाढी विशेष गाड्या चालवणार आहे.
या एकेरी विशेष गाड्यांसह, मध्य रेल्वे सध्या ८३ आषाढी विशेष गाड्या चालवणार आहे. पुणे-मिरज एकेरी विशेष ट्रेन क्रमांक ०१४१३ एकेरी विशेष गाडी ८ जुलै रोजी पुणे येथून सकाळी ७ वाजता सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी दुपारी १२. ३० वाजता पोहोचेल. ही गाडी लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी आणि सांगली या स्थानकांवर थांबेल. या गाडीला २ वातानुकूलित तृतीय, १० शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सेकंड सीटिंग व सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन असे डब्बे असतील.
मिरज- नागपूर एकेरी विशेष गाडी क्रमांक ०१२१३ एकेरी विशेष गाडी ८ जुलै रोजी मिरज येथून १२.५५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १२. २५ वाजता पोहोचेल. ही गाडी अरग, सलगरे, कवठे महांकाल, ढालगाव- जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, सांगोला, पंढरपूर, कुर्दुवाडी, दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, पंढरगाव, चांदगाव, अकोला, मुर्तिजापूर या स्थानकावर थांबेल. या गाडीला २ वातानुकूलित तृतीय, १० शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सेकंड सीटिंग व सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन असे डब्बे असतील.
मिरज-लातूर अनारक्षित एकेरी विशेष ट्रेन क्रमांक ०१४०९ अनारक्षित एकेरी विशेष ६ जुलै रोजी मिरज येथून सकाळी ९. ३० वाजता सुटेल आणि लातूर येथे त्याच दिवशी संध्याकाळी ७. २० वाजता पोहोचेल. या गाडीला अरग, कवठे महांकाळ, धालगाव, सांगोला, पंढरपूर, मोडलिंब, कुडूवाडी, शेंद्री, बार्शी टाउन, पांगरी, धाराशिव, येडसी, कळंब रोड, धोकी, मुरुड, औसा रोड आणि हरंगुळ या स्थानकावर थांबेल. या गाडीला १२ सामान्य द्वितीय श्रेणी चेअर कार आणि २ सेकंड सीटिंग आणि सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन असे डब्बे असतील. आषाढी विशेष ट्रेन क्रमांक ०१४१३ आणि ०१२१३ चे एकेरी बुकिंग २९ जून रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर विशेष शुल्कासह सुरू होईल.