पर्यटन योजनेतून एसटी बसमधून महाराष्ट्र फिरा

प्रवास, जेवण, निवास सर्व काही मिळणार माफक दरात


मुंबई : तुम्हालाही राज्यभर फिरायचे स्वप्न आहे पण खर्चाचा विचार करून मागे हटता? मग आता टेन्शन घेण्याचे काहीच कारण नाही! कारण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नागरिकांसाठी सुरू केली आहे एक खास पर्यटन योजना, जिच्यामध्ये प्रवास, जेवण आणि निवास सगळे काही अगदी माफक दरात मिळणार आहे.


या योजनेअंतर्गत एसटी महामंडळाने खासगी ट्रॅव्हल कंपन्यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळांसाठी नियोजित सहलींचं आयोजन केलं आहे. विशेष म्हणजे या सहलींमध्ये फक्त प्रवास नव्हे, तर राहण्याची आणि जेवणाचीही सोय असणार आहे. त्यामुळे तुम्ही फक्त बॅग पॅक करा आणि निघा बाकी सगळे एसटी महामंडळ सांभाळेल! ही योजना सर्व वयोगटातील आणि सामाजिक गटांतील नागरिकांसाठी खुली आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण प्रवासी आणि विद्यार्थी सगळ्यांना या सहलीतून फायदे मिळणार आहेत. अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांनाही ही योजना सहज परवडेल. या सहली गर्दीच्या काळात आयोजित केल्या जाणार नाहीत. त्यामुळे मंदिरांमध्ये त्रासदायक रांगा नाहीत, नाहक गडबड नाही फक्त शांत, आरामदायक आणि भक्तीमय अनुभव अनुभवयास मिळणार.

एसटी पर्यटन योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये


धार्मिक स्थळांसाठी नियोजित सहली
प्रवास, भोजन आणि निवासाचा एकत्रित लाभ
सर्व वयोगटांसाठी परवडणारे दर
कमी गर्दीच्या दिवसांत सहलींचं आयोजन
विद्यार्थ्यांसाठी पासची सुविधा आता शाळेतच

Comments
Add Comment

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती