Stock Market Update: सकाळी बाजारात सुस्त तेजीचे संकेत सेन्सेक्स १३०.९५ व निफ्टी ८२.०५ अंकांने उसळला! 'अशी' असेल बाजाराची दिशा

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात किंचित वाढ झाली आहे. प्रामुख्याने इस्त्राईल व इराण यांच्यातील युद्धाविरामामुळे बाजारातील भावना तेजीच्या बाजूने झुकल्या असल्यतरी काल संध्याकाळपर्यंत पुन्हा एकदा सोन्याच्या, कच्च्या तेलाच्या निर्देशांकात वाढ सुरू झाली आहे.आंतरराष्ट्रीय बाजारातील दबाव गेला असलातरी फेडरल रिझर्व्ह व्याजदरात लवकर कपात होण्याची शक्यता नसल्याने पुन्हा एकदा अमेरिकन बाजारातील चिंता भारतीय बाजारात परिवर्तित होण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स (Sensex) मध्ये १३०.९५ अंकाने वाढ होत पातळी ८२८७३.९२ पातळीवर पोहोचला तर निफ्टी  (Nifty 50) निर्देशांकात ८२.०५ अंकाने वाढ झाली असल्याने निर्देशांक पातळी २५३२६.८० पातळीवर पोहोचली आहे.

सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये किरकोळ वाढ झाली आहे. मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.१९%, ०.३६% वाढ झाली आहे. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.६%,०.०६% वाढ झाली आहे. वीआयएक्स अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) १.०९% वधारल्याने अपेक्षित उसळी शेअर बाजारात दिसली नाही. मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये होत असलेली सातत्याने वाढ आज मात्र स्थिरावली आहे. बरोबरच सेन्सेक्स बँक निर्देशांक ३५.७५ अंकाने व बँक निफ्टी निर्देशांक ५८.६० अंकाने वधारला होता. त्यामुळे बँक निर्देशांकात असलेली तेजीही कमी झालेली दिसून येते.

निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Nifty Sectoral Indices) यामध्ये संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. वाढ प्रामुख्याने सर्वांधिक प्रमाणात मेटल (०.९३%), फायनांशियल सर्विसेस (०.५३%), ऑटो (०.३०%), फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (०.६८%) , कंज्युमर ड्युरेबल्स (०.४१%), तेल व गॅस (०.५०%) समभागात (Shares) झाली आहे. नुकसान मात्र सर्वाधिक प्रमाणात रिअल्टी (०.८२%), आयटी (०.३१%), मिडिया (०.४१%), मिडस्मॉल फायनांशियल सर्विसेस (०.२०%), पीएसयु बँक (०.११%) समभागात झाले आहे.

विशेषतः खाजगी बँक (०.११%) समभागात वाढ झाली असताना पीएसयु बँकांच्या (०.११%) समभागात नुकसान झाल्याने बाजारातील सपोर्ट लेवलला काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे. याशिवाय आज सकाळी गिफ्ट निफ्टीत ०.१४% वाढ झाल्याने बुलिश ट्रेंड कायम राहिल अशी आशा गुंतवणूकदारांना असली तरी दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल.

सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ अलोक इंडस्ट्रीज (५.७८%), केएनआर कन्स्ट्रक्शन (४.८४%), वर्लपूल इंडिया (४.३१%), ट्रायडेंट (४.०९%), डेटा पॅटर्न (३.८४%), न्यूजेनसॉफ्टवेअर (३.३८%), तेजस नेटवर्क (३.१८%), जेएम फायनांशियल (२.३१%), ट्युब इनव्हेसमेंट (२.०३%), जेएसडब्लू इन्फ्रास्ट्रक्चर (२.१८%), बजाज फायनान्स (२.१६%), जिओ फायनांशियल (२.०८%), सिटी युनियन बँक (१.९८%), श्री सिमेंट (१.५५%), अदानी पॉवर (१.४५%), भारत इलेक्ट्रॉनिक (१.३५%), टाटा स्टील (१.११%,) भारती एअरटेल (१.०९%), ग्रासीम इंडस्ट्रीज (०.८९%), अदानी पोर्टस (०.७८%), जिंदाल स्टील (०.७३%) या समभागात वाढ झाली आहे.

तर सर्वाधिक घसरण एन्ड्युरन्स टेक (२.३९%), युपीएल (१.८१%), नेटवर्क १८ (१.८१%), कोलगेट (१.७२%), सम्मान कॅपिटल (१.१९%), फेडरल बँक (१.१२%), दीपक फरर्टिलायझर (१.०८%), डीएलएफ (१.०८%), रामकृष्ण फोर्ज (१.०५%), डॉ रेड्डीज (१.०४%), क्रिसील (१.०३%), लोढा डेव्हलपर (१.५७%), टोरंट (१.००%), टेक महिंद्रा (०.८६%), वरूण बेवरेज (०.८१%), सिमेन्स एनर्जी (०.६१%), होडांई मोटर्स (०.४७%), बँक ऑफ बडोदा (०.४४%), मदर्सन (०.२५%), सीजी पॉवर (०.२५%), इन्फोसिस (०.२५%) या समभागात झाली आहे.

आजच्या बाजारातील सुरूवातीच्या कलाबद्दल प्रतिक्रिया देताना जिओजित इनव्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले की,'इस्राईल आणि इराणमधील युद्धबंदीमुळे, जागतिक बाजारपेठा जोखीम घेण्याच्या स्थितीत आहेत. परंतु परस्पर कर समस्येवर अद्याप लक्ष केंद्रित करायचे असल्याने, तेजीत राहणे कठीण होईल. जवळच्या काळात बाजाराचे लक्ष ९ जुलै रोजी परस्पर करच्या ९० दिवसांच्या विरामानंतर काय घडते यावर असेल. अमेरिकेसोबत द्विपक्षीय व्यापार करारांमध्ये कोणते देश यशस्वी होतील यावर बारकाईने लक्ष ठेवले जाईल.संभाव्य भारत-अमेरिका कराराबद्दलच्या सकारात्मक बातम्या बाजारासाठी एक धक्का ठरतील. या आघाडीवर निराशा ही तेजीला अडथळा ठरेल.

भारतीय मूल्यांकने आर्थिक वर्ष २६ च्या अंदाजे कमाईच्या २२ पटीने वाढली आहेत तर चिनी शेअर्सचा पीई (हँगसेंग इंडेक्स) १५ च्या आसपास आहे, त्यामुळे एफआयआय बाजारात विक्रीचा दबाव आणण्याची शक्यता आहे. मूल्यांकनातील या प्रकारच्या फरकामुळे एफआयआयची 'भारत विकून टाका, चीन विकत घ्या' ही रणनीती पुन्हा सुरू होऊ शकते. तथापि, डीआयआय मोठ्या प्रमाणात तरलतेवर बसलेले असल्याने, संभाव्य एफआयआय विक्रीचा बाजारावर नगण्य परिणाम होण्याची शक्यता आहे.'

आजच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना जिओजित इनव्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनितीकार आनंद जेम्स म्हणाले की,'जरी आपण वरच्या बाजूने आपली नजर हटवली नसली तरी, गतीचा अभाव सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. जर घसरण प्रथम दिसून आली तर ती २५१७३-१२७ क्षेत्रामध्येच राहण्याची अपेक्षा करा. नकारात्मक बाजू २५०१४-२४९४० च्या परिसरात ठेवली जाऊ शकते. पर्यायीरित्या, जर प्रथम थेट वाढ झाली तर, सुरुवातीला २५३३० च्या जवळ एकत्रीकरण अपेक्षित आहे, त्यानंतर २५४६०-५५० पर्यंत वाढ अपेक्षित आहे.'
Comments
Add Comment

अर्ज भरल्यापासून उमेदवाराला दैनंदिन खर्चाची नोंद ठेवणे बंधनकारक, सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांची माहिती

मुंबई (विशेष प्रतिनिधी): उमेदवारी अर्ज सादर केल्यापासून उमेदवारांनी दैनंदिन निवडणूक खर्चाची नोंद ठेवणे

मुंबईत गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये तब्बल ७०२ मतदान केंद्र

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी एकूण १० हजार २३१ मतदान केंद्रे

BMC News : निवडणूक कामात गैरवर्तणूक, महापालिकेने केले अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ कामकाजात गंभीर स्वरूपाचे गैरवर्तणूक

बिहारच्या रस्ते विकासासाठी २०२६ ठरणार महत्त्वाचे! केंद्र सरकाने दिला महामार्गाला हिरवा कंदील

बिहार: बिहारच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी २०२६ हे वर्ष महत्त्वाचे ठरणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या

मुंबईत महायुतीमधील बंडोबांना थंड करण्यासाठी समन्वयकांची नियुक्ती

अर्ज मागे घेण्याचा उद्याचा शेवटचा दिवस; निष्ठावंत कार्यकर्त्यांना खुद्द मुख्यमंत्र्यांनी केले फोन मुंबई :

Pune Fire News : धुराचे लोट आणि फटाक्यांचे स्फोट! पिंपरी-चिंचवडमध्ये गजानन रुग्णालयाखाली अग्नितांडव; पाहा थरकाप उडवणारा VIDEO

पुणे : पिंपरी-चिंचवड : औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी परिसरात आज दुपारी आगीची एक मोठी घटना