घोडबंदर रोड सिग्लनजवळ वेग नियंत्रक पट्ट्या प्रायोगिक तत्वावर लावा

  46

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश


ठाणे  : घोडबंदर रोडवरील पाच वाहतूक सिग्नलपाशी प्रायोगिक तत्त्वावर रम्बलर (वेग नियंत्रक पट्ट्या) लावण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास घोडबंदर रोडवरील सर्वच सिग्नलपाशी त्यांची अमलबजावणी करण्यात येणार आहे.


अपघात टाळण्यासाठी सिग्नलपाशी वाहनांचा वेग कमी करून अवजड वाहने नियंत्रित करण्याची आवश्यकता असल्याचे मत जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी बैठकीत मांडले. या सूचनेचा अवलंब करण्यासाठी महापालिकेचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलीस यांनी संयुक्तपणे पाच ठिकाणांची निवड करावी.


तेथे प्रायोगिक तत्त्वावर ही व्यवस्था करावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले. हा प्रयोग करताना वाहन चालकांना दिसेल अशा पद्धतीने त्याचा इशारा देणारी पाटी, रिफ्लेक्टर्स आदी गोष्टी शास्त्रशुद्ध पद्धतीने कराव्यात. इंडियन रोड कॉंग्रेसने निर्धारित केलेल्या सर्व मार्गदर्शक नियमांचे पालन करावे, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.


घोडबंदर रस्ता आणि परिसरातील नागरी कामांविषयी चर्चा करण्यासाठी जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींसोबत बैठकीचे आयोजन महापालिका आयुक्त कार्यालय येथे नुकतेच करण्यात आले होते. आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत वाघबीळ येथील अंतर्गत रस्ता, भाईंदरपाडा आणि साईनगर येथील सेवा रस्त्याची दुरावस्था, रोझा गार्डिनिया येथील प्रस्तावित वाहतूक बेट आदी विषय प्रतिनिधींनी मांडले. त्यावर, कालबद्ध कार्यक्रम घेऊन पूर्तता करण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी संबंधित विभागांना दिले.


तसेच, रस्त्यावरील राडा रोडा, वायरी, अनावश्यक बॅरिकेड्स आदी काढून टाकरण्यासाठी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो आणि एमएमआरडीए यांनी संयुक्तपणे सर्वंकष स्वच्छता मोहीम (डीप क्लिन ड्राईव्ह) घ्यावी,असेही आयुक्त राव यांनी सांगितले.


गायमुख आणि परिसरातील कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बहुपर्यायी उपाययोजना करण्याची आवश्यकता प्रतिनिधींनी व्यक्त केली. तसेच, काही मोठ्या गृहसंकुलांनी छोटेखानी कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याची तयारी दर्शवल्याचेही या प्रतिनिधींनी सांगितले. घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी व्यापक लोकसहभागाची आवश्यकता असून त्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे, असे आयुक्त राव यांनी यावेळी स्पष्ट केले.


तसेच, ज्या गृहसंकुलांनी घनकचरा व्यवस्थापनात रस दाखवला आहे, त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्याकडे बैठक आयोजित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व रिक्षा थांब्यांचे वाहतूक पोलीस, परिवहन विभाग आणि महापालिका यांच्यामार्फत संयुक्त पाहणी करण्याचे या बैठकीत ठरले. रिक्षा थांब्यांच्या जागा निश्चित करून त्यांचे नियमन करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांनी सांगितले.

Comments
Add Comment

पोलीस अधिकारी संभाजी देशमुख यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

कल्याण : पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगीरीमुळे राज्य गुप्त वार्ता विभागातील पोलीस अधिकारी संभाजी देशमुख

ठाणेकरांनो, पाण्याचा जपून वापरा करा

मंगळवारी ८ तास पाणीपुरवठा बंद डोंबिवली  : केडीएमसीच्या कल्याण (पूर्व) परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील

श्रीकृष्णनाथ पांचाळ ठाण्याचे जिल्हाधिकारी

मुंबई : जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची महाराष्ट्र सरकारने बदली केली असून ठाण्याचे

मध्य रेल्वेची ऐन सकाळी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत, रेल्वे रुळाला तडे गेल्याने नोकरदारांचे झाले हाल

कर्जत: मध्य रेल्वेची लोकल वाहतूक आज सकाळी काही तासांसाठी विस्कळीत झालेली पाहायला मिळाली. पण रेल्वे प्रशासनाच्या

सॅनिटरी नॅपकिन बनवणारी मशीन भंगारमध्ये

सहा वर्षे धूळ खात पडून भाईंदर : महिलांच्या मासिक पाळी काळात स्वच्छता वाढवण्यासाठी तसेच महिलांना रोजगार उपलब्ध

दूषित पाण्यामुळे डोंबिवलीकरांचे आरोग्य धोक्यात

ठाणे  : डोंबिवली पश्चिमेतील गृहनिर्माण सोसायट्यांना दूषित व पिवळसर रंगाचा पाणीपुरवठा होत असून, यामुळे नागरिक