नववी नापास रिंकू सिंह झाला शिक्षण अधिकारी

लखनऊ : कोलकाता नाईट रायडर्स संघाने २०२५ च्या लिलावात तीन कोटी रुपये मोजून ज्या रिंकू सिंहला आपल्यासोबतच ठेवण्याचा निर्णय घेतला त्याचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला. समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांच्यासोबत रिंकूचा साखरपुडा झाला. या साखरपुड्याला काही दिवस होत नाहीतच तोच रिंकूला सरकारी नोकरी मिळाली आहे.

डीपीएस अर्थात दिल्ली पब्लिक स्कूलमधून आठवी उत्तीर्ण झालेला आणि नववीत नापास झाल्यानंतर आर्थिक कारणांमुळे शालेय शिक्षण सोडून मिळेल ते काम करत पैसे कमवू लागलेला रिंकू क्रिकेट छान खेळतो. आयपीएलमुळे रिंकूची क्रिकेट वर्तुळात ओळख निर्माण झाली आहे. असा हा लोकप्रिय होत असलेला क्रिकेटपटू लवकरच समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांच्यासोबत लग्न करणार आहे. हे लग्न होण्याआधीच नववी नापास रिंकू उत्तर प्रदेश सरकारचा शिक्षण अधिकारी झाला आहे. 'बेसिक शिक्षा निदेशक' यांनी आदेश काढून रिंकूला 'सीधी भर्ती नियमावली-२०२२' अंतर्गत शिक्षण अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.

नव्या हंगामाचे क्रिकेटचे वेळापत्रक येण्याआधीच रिंकूचे लग्न ठरले होते. आधी हे लग्न नोव्हेंबर २०२५ मध्ये वाराणसी येथे होणार होते. पण क्रिकेटमधील व्यस्त कार्यक्रमामुळे आता लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. लग्नाची नवी तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. याआधी रिंकू शिक्षण अधिकारी झाला आहे.

रिंकूच्या प्रेरणादायी प्रवासाने अनेक तरुणांना आत्मविश्वास दिला आहे. त्याला सरकारी नोकरी देऊन खेळाडूचा सन्मान करत असल्याचे उत्तर प्रदेश सरकारचे म्हणणे आहे. तर समाजवादी पक्षातील खासदाराच्या होणाऱ्या पतीला सरकारी नोकरी देऊन योगी आदित्यनाथ सरकार एक नवी राजकीय खेळी खेळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मूळचा अलीगडचा असलेला रिंकू सिंह क्रिकेटपटू आहे तर त्याची होणारी पत्नी प्रिया सरोज ही मच्छलीशहर लोकसभा मतदारसंघाची समाजवादी पक्षाची खासदार आहे. प्रियाचे वडील तुफानी सरोज हे आधी समाजवादी पक्षाचे खासदार होते आणि सध्या ते जौनपूर जिल्ह्यातील केरकट विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

 
Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव