जुन्या कंत्राटी सफाई कामगारांना सेवेत सामावून घ्या

अन्यथा ठेकेदाराला कल्याण-डोंबिवलीत फिरू न देण्याचा इशारा


कल्याण  : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने घनकचरा विभागात नवीन ठेकेदार नियुक्त केला असून या नव्या ठेकेदाराने जुन्या कंत्राटी कामगारांना न घेता नव्याने कामगार भरती केली आहे. यामुळे ६०० कामगार घरी बसले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या कंत्राटी कामगारांसह केडीएमसी मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. आधीच्या कंत्राटी कामगारांना कामावर न घेतल्यास सबंधित ठेकेदाराला कल्याण-डोंबिवलीत फिरू न देण्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी यावेळी दिला.


यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना कल्याण डोंबिवली अध्यक्ष उल्हास भोईर, महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर, कार्याध्यक्ष रोहन आक्केवार, सरचिटणीस कपिल पवार, चिटणीस भिमदास जाधव, गणेश लांडगे, युनिट अध्यक्ष मच्छिंद्र तांदळे, कैलास पारधी, रतन चव्हाण, अविनाश पाटील आदी पदाधिकाऱ्यांसह कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


महानगरपालिकेच्या घनकचरा विभागात सुमारे ३५२ वाहनचालक व ११२० सफाई कामगार सेक्युर वन सिक्युरिटी सर्विसेस मध्ये काम करत होते. त्यानंतर महापालिकेतर्फे सुमित एल्कोप्लास्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला ठेका देण्यात आला. महापालिकेच्या धोरणाप्रमाणे कंत्राटदार बदलला तरी कामगार तेच राहतील, याला अनुसरून नवीन कंत्राटदार सुमित एल्कोप्लास्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदाराने या कामगारांपैकी आत्तापर्यंत सुमारे ६०० कामगारांची चाचणी घेऊन त्यापैकी फक्त ३०० कामगारांना सेवेत रुजू करून घेतले व उर्वरित कामगारांना कामावर घेणे अपेक्षित असताना बाह्य यंत्रणेद्वारे कामगारांची भरती चालू केली असून एकप्रकारे कंत्राटदार कामगारांवर अन्याय करत आहे.


सनदशीर मार्गाचा अवलंब म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेने तर्फे औद्योगिक न्यायालय दावा क्रमांक ५७/२०२५ दावा केला होता. त्यात या नमूद कामगारांच्या यादी पैकी कामगारांना कामावर घेण्याचे आदेश न्यायालयाने सुमित एल्कोप्लास्ट प्रायव्हेट लिमिटेड यांना दिलेले असूनही हा कंत्राटदार औद्योगिक न्यायालयातील यादीतील नावे वगळून बाहेरील कामगारांची भरती करत आहे. याकडे केडीएमसी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसेच्या वतीने केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढत धडक दिली.

Comments
Add Comment

सर्पदंश झालेल्या मावशीचाही उपचारादरम्यान मृत्यू!

मृतांच्या नातेवाइकांचे मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन कल्याण (वार्ताहर) : साडेचार वर्षांच्या

बदलापूरमध्ये परप्रांतीय फेरीवाल्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोपले

बदलापूर : अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई सोमवारी पश्चिम

उघड्या नाल्याच्या चेंबरमध्ये पडून मुलाचा मृत्यू

डोंबिवली : उघड्या नाल्याच्या चेंबरमध्ये पडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार २८ तारखेला रात्री आठ

एका जाडजूड बॅगेने घेतला रेल्वे प्रवाशांचा जीव, मुंब्रा अपघात प्रकरणी हाती आली नवी माहिती

मुंब्रा : जून २०२५ मध्ये मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला होता. काही प्रवासी रेल्वे रुळावर तसेच दोन

डोंबिवलीत प्रियकराने केली आत्महत्या, पण नेमकं कारण काय? खरंच प्रेयसीसोबत वाद झाला होता का?

प्रेमसंबंधातील वाद की काहीतरी वेगळं? डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील राहुलनगर परिसरात शनिवारी दुपारी घडलेल्या

ठाणे हायस्पीड रेल्वे स्टेशन होणार देशातील पहिले मल्टीमोडल इंटीग्रेटेड स्टेशन

आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन ठाणे : ठाण्यात सर्व वाहतूक सुविधांचे जंक्शन तयार होणार आहे. शहराचे आमूलाग्र