रुग्णालयातील स्वच्छतेवर चक्क नऊ कोटी खर्च; मनपाचा वैद्यकीय विभाग ठेकेदारांवर मेहेरबान?

नाशिक : महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील पाच रुग्णालयांमध्ये साफसफाईच्या कामांसाठी तब्बल नऊ कोटींचा खर्च करण्याची तयारी सुरू केली आहे.
याबाबतचा प्रस्ताव महासभेवर ठेवला असता त्यास मंजुरी देण्यात आली आहे.


केवळ नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयातील स्वच्छता आऊटसोर्सिगवर देण्यात आली आहे. दरम्यान, बिटकोतील स्वच्छतेबाबत ठेकेदाराला कटू अनुभव असतानाही पालिकेच्या वैद्यकिय विभागाने शहरातील आणखी पाच रुग्णालयातील साफसफाइचे काम ठेकेदारांसाठी नऊ कोटींचा खर्च करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे
महापालिकेची स्वत:ची स्वतंत्र रुग्णालये आहेत. परंतु रुग्णालयातील स्वच्छतेकरिता पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे कारण देऊन वैद्यकिय विभागाने तीन वर्षाच्या ठेकेदारी तत्वावर साफसफाईचे काम देण्याचे मनसुबे आहे.


जुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन, पंचवटीतील इंदिरा गांधी, सातपूर रुग्णालय, नवीन नाशिक व मेनरोडवरील जिजामाता रुग्णालयात साफ सफाईचे काम देऊन नऊ कोटींचा करण्याचा डाव आखल्याची चर्चा पालिका वर्तुळात होते आहे. धक्कादायक म्हणजे यापूर्वी सदर रुग्णालयातील कामे कधीही आऊटसोर्सिगच्या माध्यमातून केली गेली नाही. परंतु पालिकेच्या वैद्यकिय विभागाकडून वरील रुग्णालयातील स्वच्छतेच्या कामावर कोटयावधीचा खर्च करण्याचा घाट घातला जात आहे.
सद्यस्थितीत आरोग्य विभागाकडे चतुर्थश्रेणी पदावरील ७५ आया व ४६ वॉर्डबॉय इतके कर्मचारी कार्यरत आहेत.


मात्र अपुरे मनुष्यबळ असल्याने पाचही रुग्णालयांमध्ये साफसफाईचे कामकाज करणेकरीता मनपा आयुक्त यांनी दिलेल्या सुचनेनुसार कंत्राटदारामार्फत साफसफाईचे कामकाज केले जाणार आहे. या दृष्टीकोनातुन आवश्यक बाबींचा अंतर्भाव करुन ई-निविदा तयार करण्यात आली आहे.


मनपाचे ठेकेदारांसाठी कार्य
पुढील तीन वर्ष पर्यतच्या कामाची ई-निविदा अन्वये शासन नियमाप्रमाणे सदर सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय, सातपूर रुग्णालय, श्री. स्वामी समर्थ रुग्णालय, नवीन नाशिक, जिजामाता रुग्णालय या पाच रुग्णालयांमध्ये साफसफाई करणेकामी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. ठेकेदारांसाठी मनपा प्रशासन कार्य करत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

Pune Crime Firing : घायवळ गॅंगचा प्रकाश धुमाळांवर गोळीबार, २०० मीटरवर पोलिस स्टेशन तरी पोलिसांना यायला अर्धा तास का लागला?

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे थैमान थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतेच टोळीयुद्धाचे प्रकार घडून

Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध