Madhuri Misal : नागरिकांना मिळणार दिलासा ! मिळकतकरासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने राज्यसरकारकडे पाठवावा...

पुणे :  मिळकत करावर दंड आणि व्याज लावला जात असल्याने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नागरिकांसाठी मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. मिळकत करावर दंड व व्याज लावला जात असल्याने मिळकत कराची रक्कम दुप्पट आणि तिप्पट वाढते, त्यामुळे अनेक नागरिक कर भरत नाहीत. ही बाब राज्य सरकारच्या निदर्शनास आल्याने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.


राज्याच्या नगर विकास खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मिळकत करावर आणि बिलावर आकारलेला दंड व व्याज कमी केल्यास कर आकारणी वाढेल, गावांमधील रहिवाशांवरही अन्याय होणार नाही, अशी कर रचना करावी अशीही सूचना महापालिकेला केल्या आहेत, अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी माहिती दिली.


मिसाळ यांनी गुरुवारी महापालिकेत बैठक घेतली. यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी, ओमप्रकाश दिवटे, चंद्रन आदी उपस्थित होते. मिसाळ यांनी बैठकीत झालेल्या विविध विषयांवरील चर्चेबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली. मिसाळ म्हणाऱ्या, "राज्य सरकारने कर आकारणीसंदर्भातही लक्ष्यकेंद्रीत काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


वेळेवर मिळकत कर न भरल्यामुळे व्याज व दंडाची रक्कम वाढते. त्यामुळे नागरिक मिळकर कर भरण्यास दुर्लक्ष करतात. त्यामुळे मिळकर करावरील व्याज व दंड कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नव्याने प्रस्ताव तयार करुन पाठविण्यास सांगितले. त्यामुळे गावातील नागरिकांवर अन्याय होणार नाही. संबंधित बाबींचा विचार करुन प्रस्ताव पाठवण्यात यावा. असे आदेश मिसाळ यांनी दिले आहेत.
















Comments
Add Comment

रोहित आर्याने विनापरवानगी शाळांकडून पैसे गोळा केले!

नागपूर : पवई येथे १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याच्या एन्काऊंटर प्रकरणाची चर्चा मंगळवारी विधानसभेत झाली.

'तुकडेबंदी' शिथिल करणारे विधेयक विधानसभेत मंजूर

सातबारावर आता स्वतंत्र नाव लागणार नागपूर : राज्यातील नागरी वस्त्यांमध्ये गुंठेवारी किंवा लहान भूखंडांवर

शरद पवारांच्या पक्षातील सूर्यकांत मोरे विरोधात हक्कभंग

जामखेड : जामखेड नगरपालिका निवडणूक प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सूर्यकांत मोरे

मंत्री नितेश राणे यांचे विधानपरिषदेत आश्वासन; महिलांच्या सुरक्षेसाठी विदेशातून 'हँड ग्लोज' मागवणार

नागपूर: नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मच्छीमार व्यवसायातील महिलांना कोळंबी सोलत असताना होणाऱ्या शारीरिक

गुटखा विक्रेत्यांना 'मकोका' लावणार!- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गुटखा बंदीसाठी कायद्यात बदल करणार

नागपूर : "गुटखा विक्री करणाऱ्यांवर मकोका लागू करण्याचा प्रस्ताव विधी आणि न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता.

विधानपरिषद सभापती-सदस्यांचा अपमान केल्याप्रकरणी सूर्यकांत मोरे हक्कभंगाच्या कचाट्यात

नागपूर: नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या एका पदाधिकाऱ्याने केलेल्या