ना. भुजबळांच्या आदेशाला ठेकेदारांची ‘मातीची टोपली’

पिंपळस - येवला रस्त्यावरील खड्ड्यांत माती; अपघातांचा वाढला धोका


निफाड : पिंपळस ते येवला रस्त्यावर सध्या काँक्रीटीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या कामाची पाहणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. त्यावेळी त्यांनी संबंधित ठेकेदारांना आदेश दिले होते की, वाहतुकीसाठी खुल्या ठेवलेल्या मार्गावर असलेले खड्डे तात्पुरते का होईना पण बुजवण्यात यावेत, जेणेकरून प्रवाशांना आणि वाहनचालकांना त्रास होणार नाही. मात्र, ठेकेदारांनी या आदेशाची अंमलबजावणी करताना हलगर्जीपणा केल्याचे समोर आले आहे.


खड्डे बुजवण्यासाठी आवश्यक असलेल्या डांबर-खडी किंवा योग्य रस्ते साहित्याचा वापर न करता सरळ माती टाकून खड्डे बुजवले गेले आहेत. परिणामी, पावसाळ्यात ही माती निसटून चिखलात रूपांतरित होत आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना मोठ्या अपघाताचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी वाहन घसरून पडल्याच्या घटना घडल्या असून काही ठिकाणी नागरिक किरकोळ जखमीही झाले आहेत. चिखल साचल्यामुळे रस्त्यांवरून चालणे देखील कठीण झाले आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळच्या वेळी शालेय विद्यार्थ्यांसह नोकरीनिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. धूळ आणि माती उडाल्याने अनेकांना डोळ्यांमध्ये आग होणे, खवखव, आणि इतर आरोग्यविषयक तक्रारी निर्माण होत आहेत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिलांना विशेषतः या असुरक्षित रस्त्यांमुळे धोका निर्माण झाला आहे.


स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेक वेळा ग्रामपंचायतीपासून ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या, परंतु अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. ठेकेदारांचे मनमानी व प्रशासनाची उदासीनता यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.या पार्श्वभूमीवर ठेकेदारांवर योग्य कारवाई करून, खड्डे योग्य साहित्य वापरून बुजवण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. पावसाळा सुरु झालेला असताना, तातडीने योग्य रस्ते डागडुजी न केल्यास भविष्यात मोठ्या अपघातांचे संकट उभे राहू शकते. प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी याची गंभीर दखल घेऊन त्वरित उपाययोजना करावी, हीच जनतेची अपेक्षा आहे.




मंत्री महोदयांनी पाहणी केल्यानंतर काहीसा दिलासा वाटला होता. मात्र कामाच्या दर्जाबाबत आणि तात्पुरत्या उपायांबाबत अजूनही गंभीर दुर्लक्ष होत आहे. माती टाकून खड्डे बुजवले जाणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे.
- संजय पाटोळे, सामाजिक कार्यकर्ते


Comments
Add Comment

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

ताम्हिणी घाटातील सिक्रेट पॉईंटवर खून आरोपी २४ तासात पोलिसांच्या ताब्यात

माणगाव : ताम्हिणी घाटात सणसवाडी बेडगाव हद्दीत सिक्रेट पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी अनोळखी इसमाचा मृतदेह