सानपाड्यातील समस्या सोडविण्यासाठी भाजपाची पालिकेवर धडक

लवकरात लवकर समस्यांचे निवारण करण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन


नवी मुंबई : सानपाडा नोडमधील नागरी समस्या निवारणासाठी व नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याने भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष व अखिल भारतीय माथाडी युनियनचे अध्यक्ष पांडुरंग आमले यांनी सानपाड्यातील रहिवाशांसमवेत महापालिका मुख्यालयात जावून संबंधित अधिकाऱ्यांना समस्यांचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले. लवकरात लवकर या समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन महापालिका अधिकाऱ्यांकडून पांडूरंग आमले व त्यांच्यासमवेत गेलेल्या शिष्टमंडळातील रहिवाशांना देण्यात आले.


सानपाडा सेक्टर १० मधील झाशीची राणी मैदान व सेक्टर ७ मधील सीताराम मास्तर उद्यानाचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, सानपाडा सेक्टर ७ मधील सप्तरंग सोसायटी व बाबू गेनू मैदानासमोरील रस्त्यावरील चेम्बर्सची दुरुस्ती करण्यात यावी, पावसाळा सुरु झाला तरीही सानपाडा नोडमधील धोकादायक झाडांची व ठिसूळ झालेल्या फांद्याची छाटणी झालेली नसल्याने जिवितहानी व मालमत्तेची संभाव्य हानी टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने तातडीने वृक्षछाटणी अभियान राबवावे, सानपाडा सेक्टर ८ मधील पदपथावर अतिक्रमण करुन पदपथ गिळकृंत करणाऱ्या फेरीवाल्यांना तातडीने हटवून स्थानिक रहिवाशांना ये-जा करण्यासाठी हे पदपथ उपलब्ध करुन देण्यात यावे, सेव्हन्थ डे या शाळेसमोर शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी होत असलेली गर्दी व वाहतूक कोंडी यावर तोडगा काढण्यात यावा, सानपाडा नोडमध्ये गेल्या काही दिवसांपासून तांबूस, पिवळसर व लालसर रंगाचे दूषित पाणी येत असल्याने रहिवाशांच्या जिविताला धोका निर्माण झाला असल्याने या समस्येचे निवारण करुन रहिवाशांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा, अशा मागण्या पांडूरंग आमले व शिष्टमंडळातील स्थानिक रहिवाशांनी त्या त्या विभागाच्या उपायुक्तांची भेट घेवून त्यांना लेखी निवेदन सादर करत समस्या निवारणाबाबत त्यांच्याशी चर्चा केली.


पालिका उपायुक्तांनी आमले व त्यांच्यासोबत गेलेल्या शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर या समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले.

Comments
Add Comment

'तारघर' नवी मुंबईच्या भविष्यातील वाहतूक योजनेत एक महत्त्वाचं केंद्र!

नवी मुंबई: मागील काही दिवसांपूर्वी नवी मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी रेल्वे प्रशासनाने जाहीर

नवी मुंबईकरांना दिलासा; रेल्वेकडून अधिक गाड्या आणि नवीन स्थानकाचे आश्वासन पूर्ण

नवी मुंबई: बेलापूर/नेरूळ–उरण मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बेलापूर/नेरूळ–उरण मार्गावर

डोंबिवलीत रस्ता झाला गुलाबी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर

कल्याण : डोंबिवलीत प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे नेहमीच चर्चेत

ठाण्यात आणखी चार दिवस ५० टक्के पाणीकपात

ठाणे : ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे बंधारा येथून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी वाहून आणणारी १०००मि.

नवी मुंबईत ११ महिन्यांत ३४९ मुली बेपत्ता !

नवी मुंबई : नवी मुंबईतून १ जानेवारी ते २९ नोव्हेंबर २०२५ या ११ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ४९९ मुले-मुली बेपत्ता

फॉर्च्युनरची डुप्लिकेट नंबर प्लेट, अवैध शस्त्र आणि पूर्वगुन्हेगाराशी संबंध; पनवेलमधील पार्किंगमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस

नवी मुंबई: पनवेल पूर्व रेल्वे स्टेशन परिसरात एक फॉर्च्युनर कार संशयास्पदरित्या आढळून आल्याचे दिसले. महत्त्वाचे