Pandharpur News : 'विठ्ठलाच्या टोकन दर्शनाचा अवघ्या ९ दिवसांतच काळाबाजार'; ६ भाविक ताब्यात

पंढरपूर : तिरुपती बालाजी देवस्थानच्या धर्तीवर पंढरपुरात श्री विठ्ठल दर्शनासाठी १५ जूनपासून टोकन दर्शन प्रणाली सुरू केली आहे. मात्र, नव्याने सुरू करण्यात आलेल्या टोकन दर्शनाचा काळाबाजार अवघ्या नऊ दिवसांतच समोर आला आहे. यामध्ये बोगस टोकन दर्शन पास घेऊन येणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील सहा भाविकांना पकडण्यात आले असून, त्यांच्यावर पंढरपूर शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.


दरम्यान, टोकन दर्शन पासमध्ये हेराफेरी करून देणाऱ्या काही दलालांचा यामध्ये हात असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी मुळापर्यंत जाऊन बोगस टोकन पासचा तपास करावा, अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे. पंढरपुरात श्री विठ्ठल दर्शनासाठी १५ जूनपासून टोकन दर्शन प्रणाली सुरू केली आहे. अवघ्या १० दिवसांतच बोगस टोकन दर्शन पास तयार करण्यात आल्याची गंभीर माहिती समोर आल्याने या प्रणालीविषयी दर्शनरांगेत उभे राहणाऱ्या सर्वसामान्य भाविकांच्या मनात साशंकता निर्माण झाली आहे.




बोगस पास घेऊन हॉलमध्ये प्रवेश


सध्या विठ्ठल मंदिर समितीकडून ऑनलाइन टोकन दर्शन पास बुकिंग सुरू आहे. मंगळवारी (ता. २४) हिंगोली जिल्ह्यातील काही भाविक विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. त्यापैकी एकाकडे ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर टोकन दर्शन पास मिळाला होता. त्या एका टोकन पासच्या झेरॉक्स प्रती काढून त्यावर इतर सहा जणांनी स्वतःची छायाचित्रे लावून टोकन दर्शन पास तयार केला होता. हे सर्वजण टोकन दर्शन पास घेऊन संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथे हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी आले होते. यावेळी टोकन दर्शन पासचे स्कॅनिंग करताना बोगस टोकन दर्शन पास असल्याची बाब मंदिर समिती कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर पार्वती बाबूराव बेले, लक्ष्मीबाई केशवराव बळे, सुधाकर रामचंद्र भालेराव, केशव गणपत हरबळे, संध्या मारुती सातपुते, अरुणा विठ्ठल सातपुते, या सात भाविकांना ताब्यात घेऊन त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.




टोकन दर्शनामुळे रांगेतील भाविकांची गैरसोय


दिवसभरात जवळपास १८०० भाविकांना टोकन दर्शन दिले जाते. श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड वाढली आहे. दर्शन रांगेचे योग्य व्यवस्थापन व्हावे व भाविकांचे वेळेत व सुलभ दर्शन व्हावे यासाठी टोकन दर्शन प्रणाली सुरू केली आहे. यामध्ये उच्चशिक्षित आणि माहीतगार असलेले भाविक अधिक संख्येने ऑनलाइन बुकिंग करून झटपट टोकन पास मिळवतात. त्यानंतर त्यांना तत्काळ दर्शनही मिळते. परंतु हीच टोकन दर्शन सुविधा दर्शनरांगेत तासन्‌तास उभे राहिलेल्या भाविकांसाठी गैरसोयीची ठरू लागली आहे.



पासमध्ये हेराफेरी


टोकन दर्शन पासमध्ये हेराफेरी केल्याचा प्रकारही समोर आला आहे. टोकन दर्शन पासमध्ये होणारी हेराफेरी टाळण्यासाठी मंदिर समितीने टोकन दर्शनासाठी ठराविक शुल्क आकारावे, अशी मागणीही या निमित्ताने पुढे आली आहे; अन्यथा टोकन दर्शन सुविधा नाकापेक्षा मोती जड ठरण्याची शक्यता आहे असं सांगन्यासांगण्यात आलं आहे.

Comments
Add Comment

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक

मुंबई मेट्रो ३ मध्ये 'उतरण्यासाठी' जिना नाही; प्रवाशांना त्रास

मुंबई : मुंबईच्या नवीन मेट्रो लाईन ३ (Aqua Line) च्या मेट्रो स्टेशनवर खाली उतरण्यासाठी सरकते जिने (Escalators) नाहीत. ऑक्टोबर

मालाडमधील फोर डायमेंशन इमारतीला आग

मुंबई: मालाड पश्चिम येथील माइंडस्पेसजवळ लिंक रोडवरील फोर डायमेंशन बिल्डिंगमध्ये शुक्रवारी आग लागली. मुंबई

मुंबईच्या काळाचौकी परिसरात रक्तरंजित थरार!

प्रेमभंगातून तरुणाचा प्रेयसीवर जीवघेणा हल्ला, नंतर स्वतः केली आत्महत्या मुंबई : मुंबईतील काळाचौकी भागात एक खूप

हातपाय बांधले आणि चोर समजून तरुणाला मरेपर्यंत मारले

मुंबई : चोर सोडून संन्याशाला फाशी ही म्हण मुंबईतील गोरेगावमध्ये काही प्रमाणात खरी ठरली. गोरेगावच्या तीन डोंगरी