अंधेरीतील आंबोली स्मशानभूमीच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा

  47

मागील सहा महिन्यांपासून पारंपरिक दाहिनीची सेवा आहे बंद


मुंबई : अंधेरी पश्चिम येथील आंबोली स्मशानभूमी मागील डिसेंबर २०२४ पासून तात्पुरत्या स्वरुपात बंद असून येथील नागरिकांना वर्सोवा आणि ओशिवरा हिंदू स्मशानभूमीत पारंपारिक दाहिनीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जावे लागत आहे. अखेर या स्मशानभूमीच्या पारंपारिक दाहिनीच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार असल्याने येथील नागरिकांना अत्यंविधीकरता होणारा त्रास कमी होणार आहे.


अंधेरी पश्चिम येथील सिजर मार्गावरील आंबोली हिंदू स्मशानभुमीचे बांधकाम जुने झाल्याने संरचनात्मक सल्लागार बी. जे. मेहता आर्किटक्चरल आणि स्क्ट्रक्चरल कन्सलटंट यांच्या लेखा परिक्षक अहवालाच्या अनुषंगाने या स्मशानभूमीच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार डिसेंबर २०२४पासून दुरुस्तीच्या कामांसाठी आंबोली हिंदू स्मशानभूमीतील पारंपरिक दहनकक्षाची सेवा रविवारी १ डिसेंबर २०२४ पासून बंद ठेवण्यात आली होती.


दुरूस्तीची ही कामे पूर्ण झाल्यानंतर हे दहन कक्ष पुन्हा उपलब्ध करून देण्यात येईल असे प्रशासनाच्यावतीने कळण्यात आले होते. त्यामुळे येथील स्थानिकांना वेसावे (वर्सोवा) हिंदू स्मशानभूमी आणि ओशिवरा हिंदू स्मशानभूमीत पारंपरिक दाहिनीवर अंत्यसंस्कार करावे लागत आहे.


मात्र, मागील सहा ते सात महिन्यांपासून दुरुस्तीच्या कामांला सुरुवात न झाल्याने काही विकासकासाठी महापालिका येथील पारंपारिक दाहिनीची सेवा बंद करत असल्याचे आरोप स्थानिकांकडून होत होते. परंतु आता खऱ्या अर्थाने या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली जाणार असून सुमारे ३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.


या कामासाठी पालिकेच्यावतीने शाह इन्फ्रा डेव्हलपमेंट्स या कंपनीची निवड केली आहे. त्यानुसारच लवकरच येथील कामाला सुरुवात होणे अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अंबोली स्मशानभूमीत पारंपारिक दाहिनीची सेवा बंद ठेवण्यात आली असली तरी नैसर्गिक वायू दाहिनी पद्धतीची अंत्यविधी सेवा कार्यरत असल्याने नागरिकांनाच याठिकाणी अंत्यविधी करता येत आहे.

Comments
Add Comment

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई

शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून पसायदानाचे पठण

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) :

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना