Corona Patient : राज्यात मागील दहा दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घसरण...

  58

पुणे : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे. राज्यात गेल्या २४ तासात नवीन रुग्णांची संख्या २५ पर्यंत पोहचली आहे. आतापर्यंत ३३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेची नोंद आहे.  तर वर्षभरात २ हजार कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात या वर्षाभरात २ हजार ३९५ रुग्ण आढळले असून ३३ रुग्णांचा मृत्यू झालेची नोंद आहे. मे आणि जून दोन महिन्यात करोना रुग्णांच्या संख्येत झपाड्याने वाढ झाली होती. ११ ते १३ तारखेपर्यंत करोना रुग्णांची संख्या शंभरवर पोहचली होती. १४ जूनपासून करोना रुग्णांच्या संख्येत घट झाली. ती जवळपास निम्म्यावर पोहचली.


राज्यात गेल्या २४ तासात कोरोना रुग्णांची संख्या २५ पर्यंत पोहचली आहे.  त्यात मुंबईत ८, नागपूर महापालिका भागात ५, छत्रपती संभाजीनगर महापालिका भागात २, छत्रपती संभाजीनगर महापालिका भागात २, तसेच पुणे महापालिका, पुणेे जिल्हा, ठाणे महापालिका, नवी मुंबई, भिवंडी, कोल्हापूर महापालिका, याठिकाणी प्रत्येकी १ रुग्ण कोरोना बाधित आढळून आला आहे. अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.


सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे अनेक संशयित कोरोना रुग्णांची तपासणी करण्यात आली  त्यात १ जानेवारीपासून ते २४ जानेवारीपर्यंत २ हजार करोनो बाधित रुग्णांची नोंद आढळून आली. मुंबई शहरात सर्वाधिक एकूण ९०० रुग्णांची नोंद झाली आहे. आता पर्यंत एकून दोन हजारहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात जानेवारीपासून ते आतापर्यंत ३३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेची नोंंद आहे. ते. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये मूत्रपिंडविकार, कर्करोग, ब्रेन स्ट्रोक, फुफ्फुस विकार, श्वसनविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, क्षयाचा आजार होता, असे सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केलंय.


Comments
Add Comment

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्य होते त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने