माझ्या खांद्यावर माझा तिरंगा, म्हणाले अंतराळवीर शुभांशू शुक्ला

  70

नवी दिल्ली : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला, पोलिश अंतराळवीर स्लावोज उझ्नान्स्की, हंगेरियन अंतराळवीर टिबोर कापू आणि अमेरिकेचा अंतराळवीर पेगी व्हिटसन हे चौघे नासाच्या केनेडी स्पेस सेंटरवरून स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगन C213 अंतराळयानाद्वारे २८ तासांच्या प्रवासाला रवाना झाले. नियोजनानुसार बुधवार २५ जून रोजी दुपारी बारा वाजून एक मिनिटाने नासाच्या केनेडी स्पेस सेंटरवरून स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगन C213 अंतराळयान २८ तासांच्या प्रवासाला रवाना झाले. यान २८ तासांचा प्रवास करुन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचेल. तिथे पोहोचताच यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला जोडले जाईल. ही डॉकिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यानातील अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात प्रवेश करतील.

यानातून ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी भारतीयांना उद्देशून एक संदेश प्रसारित केला आहे. हा संदेश त्यांनी हिंदीतून दिला. नमस्कार, माझ्या प्रिय देशवासीयांनो, काय एक प्रवास... ४१ वर्षांनंतर आपण पुन्हा अवकाशात पोहोचलो आहोत. आणि हा एक अद्भुत प्रवास आहे. सध्या आपण पृथ्वीभोवती ७.५ किलोमीटर प्रति सेकंद वेगाने फिरत आहोत. माझ्या खांद्यावर माझा तिरंगा आहे, जो मला सांगत आहे की मी एकटा नाही, मी तुमच्या सर्वांसोबत आहे; असे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला म्हणाले.

शुभांशू शुक्ला अंतराळयानातून म्हणाले की, ही माझ्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या प्रवासाची सुरुवात नाही, तर ही भारताच्या मानवी अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात आहे. आणि मला सर्व देशवासीयांनी या प्रवासाचा भाग व्हावे असे वाटते. तुमची छातीही अभिमानाने फुलली पाहिजे. तुम्हीही तोच उत्साह दाखवला पाहिजे. चला आपण सर्वजण मिळून भारताचा हा मानवी अंतराळ प्रवास सुरू करूया. धन्यवाद, जय हिंद, जय भारत.

ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे १९८४ नंतर अंतराळात जाणारे भारताचे दुसरे आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले राष्ट्रीय अंतराळवीर आहेत. याआधी १९८४ च्या एप्रिल महिन्यात रशियाच्या यानातून भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा अंतराळात गेले होते. यामुळे भारतीयांचे लक्ष अ‍ॅक्सिओम-४ मिशनकडे आहे.

अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेला घेऊन जाणारे ड्रॅगन अंतराळयान गुरुवार, २६ जून रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ४.३० वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणार आहे. अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचल्यानंतर १४ दिवसांत ६० प्रयोग करणार आहे. प्रयोगांद्वारे वैज्ञानिक संशोधन केले जाणार आहे. पृथ्वीपासून कमी अंतरावरील कक्षेतले गुरुत्वाकर्षण या विषयाशी संबंधित संशोधन प्रामुख्याने केले जाणार आहे.

  1. शुभांशू शुक्ला हे १९८४ नंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय अंतराळवीर असतील. तसेच ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर असतील.

  2. युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) प्रकल्पातील अंतराळवीर स्लावोज उझ्नान्स्की हे १९७८ नंतर अंतराळात जाणारे दुसरे पोलिश अंतराळवीर असतील.

  3. टिबोर कापू हे १९८० नंतर अंतराळात जाणारे दुसरे हंगेरियन अंतराळवीर असतील.

  4. पेगी व्हिटसन तिच्या दुसऱ्या व्यावसायिक मानवी अंतराळ मोहिमेचे नेतृत्व करणार आहेत. अमेरिकन अंतराळवीराने अंतराळात घालवलेला सर्वाधिक काळ हा तिचा सध्याचा विक्रम आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानमधून आरडीएक्सने राम मंदिर उडवण्याचा मेसेज; गुन्हा दाखल

बीड : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्री राम मंदिर उडवण्याचा मेसेज थेट पाकिस्तानातून बीड जिल्ह्यातील एका तरुणाला

इंडिगोच्या विमानात कानशिलात! पॅनिक अटॅक आलेला तरुण बेपत्ता!

मुंबई : मुंबईहून कोलकात्याकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाइटमध्ये एक धक्कादायक घटना घडली. पॅनिक अटॅकचा

Prajwal Revanna : मोठी बातमी, माजी पंतप्रधानांच्या नातूला बलात्कार प्रकरणात जन्मठेप!

बेंगळुरू :  माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांचे नातू आणि माजी JD(S) खासदार प्रज्वल रेवण्णा (वय ३४) यांना बलात्कार

Kulgam Encounter : दक्षिण काश्मीरमध्ये आणखी एक दहशतवादी ठार, आठवड्याभरात दुसरी चकमक

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यातील अखल गावात शुक्रवारी रात्री झालेल्या

एलन मस्कच्या ‘स्टारलिंक’ला भारतात परवाना

आता प्रत्येक गावात पोहोचणार थेट इंटरनेट नवी दिल्ली : अमेरिकन अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांची कंपनी स्टारलिंक

इंडिगो फ्लाइटमध्ये हाणामारी! एकाने दुसऱ्याच्या दिली कानशिलात, पुढे काय झाले? पहा व्हिडिओ

कोलकाता: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एअर होस्टेस एका प्रवाशाला मदत करताना दिसून येत आहे.