शीव उड्डाणपूल ३१ मे २०२६ पर्यंत होणार पूर्ण

मुंबई महानगरपालिका, वाहतूक पोलीस व रेल्वे विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक


मुंबई : मुंबईतील शीव (सायन) व बेलासिस उड्डाणपुलांच्या कामांना वेग मिळत असून, ही कामे गतीने आणि नियोजनबद्ध रितीने पूर्ण करण्यावर भर द्यावा. रेल्वे प्रशासनासह समन्वय साधत कामांचे सुयोग्य नियोजन करावे. सर्व कामे निर्धारित मुदतीत पूर्ण होतील, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. १५ डिसेंबर २०२५ पर्यंत बेलासिस आणि ३१ मे २०२६ पर्यंत शीव (सायन) उड्डाणपुलाची कामे पूर्ण झाली पाहिजेत, अशी ठोस कालमर्यादाही बांगर यांनी निश्चित केली आहे.


शीव पूर्व - पश्चिम भागांना जोडणारा शीव (सायन) उड्डाणपूल आणि ताडदेव ते नागपाडा आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणारा बेलासिस उड्डाणपूल या दोन्ही रेल्वे उड्डाणपुलांच्या पुनर्बांधणीचे काम मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी या दोन्ही प्रकल्प कार्यस्थळास सोमवारी २३ जून २०२५ रोजी प्रत्यक्ष भेट देऊन प्रगतीचा स्वतंत्रपणे आढावा घेतला. तसेच, २४ जून २०२५ मुंबई महानगरपालिका मुख्यालयात बैठक घेत विविध निर्देश दिले.


पोलीससह आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे, डी विभागाचे सहायक आयुक्त मनीष वळंजू, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते, महानगरपालिकेचे प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते, उपप्रमुख अभियंता (शहर) राजेश मुळे यांच्यासह मध्य रेल्वेचे उप मुख्य अभियंता (निर्माण) रोहित मेहला, सहायक अभियंता (निर्माण) व्ही. व्ही सतिशन यांच्यासह संबंधित अभियंते उपस्थित होते.


शीव पुलाचे बांधकाम ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित
अभिजीत बांगर म्हणाले की, शीव पुलाच्या दक्षिण बाजूकडील पादचारी पुलाचे काम रेल्वे विभागामार्फत सुरू असून ते ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण केले जाईल. त्यानंतर म्हणजे, ३१ ऑगस्ट २०२५ नंतर मुख्य पुलाच्या दक्षिणेकडील भागाच्या तोडकामास सुरूवात केली जाईल. त्याचवेळी पुलाखालील जुन्या पुलाच्या भिंतीचे तोडकामही सुरू केले जाईल. लाल बहादूर शास्त्री मार्गावरील एका बाजुचा भुयारी मार्ग पूर्णत्वास आला आहे. त्या पोहोच मार्गाचे काम प्राधान्याने पूर्ण केले जाईल. १ ऑक्टोबर २०२५ पासून दुस-या भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात येईल. धारावी आणि लाल बहादूर शास्त्री मार्गाकडे जाणा-या पोहोच रस्त्यांची कामे मार्च २०२६ पर्यंत पूर्ण केली जातील. उर्वरित पोहोच मार्गाचे काम १५ दिवसात पूर्ण करून शीव उड्डाणपूल ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत, असेही बांगर यांनी नमूद केले.
बोलासिस पुलाचे बांधकाम १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार


अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर पुढे म्हणाले की, बेलासिस पूल प्रकल्प पूर्णत्वाचा कालावधी एप्रिल २०२६ पर्यंत आहे. मात्र, बेलासिस पुलाचे बांधकाम नियोजित कालावधीपूर्वी पूर्ण करून डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत वाहतुकीस खुला करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. पूल बांधकामास अडथळा ठरणारी १३ बांधकामे हटविण्यासाठी पर्यायी घरांचे वाटप करण्यात आले आहे. बांधकामे हटविण्यासंदर्भातील कार्यवाही विभागीय कार्यालयामार्फत सुरू आहे. पुलानजीकच्या एका गृहनिर्माण संस्थेची सीमाभिंत बाधित होत असून तीस मोकळी जागा रस्त्यासाठी आवश्यक आहे. ती जागा उपलब्ध उपलब्ध करून देण्याची कार्यवाही विभागीय कार्यालयामार्फत केली जाणार आहे. दोन्ही पोहोच मार्गांची कामे हाती घेऊन एकंदरीत १५ डिसेंबर २०२५ पर्यंत पुलाचे संपूर्ण काम पूर्ण होईल, असे नियोजन आहे, असे अभिजीत बांगर यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

सुशोभिकरणाच्या कामांसाठी पुन्हा प्रशासनाने केला हात ढिला

माटुंगा,वडाळ्यातील कामांसाठी प्रलंबित बिलांचा मार्ग मोकळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेने हाती

मुंबई महापालिकेत ढाकणे आले, सैनी गेले

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अमित

तक्रार येईपर्यंत थांबू नका, मतदारयादीतील चुका स्वतःहून दुरुस्त करा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व

तलाठी, तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांवर आता दक्षता पथकांचा ‘वॉच’

मुंबई : सर्वसामान्य जनतेला महसूल विभागाप्रती आपलेपणा वाटावा, तसेच कामे गतिमान व्हावी, या उद्देशाने महसूल

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता डिजिटल स्वरुपात

मुंबई : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार

डिजिटल ७/१२ ला कायदेशीर मान्यता, आता केवळ १५ रुपयांमध्ये मिळणार अधिकृत उतारा

मुंबई : महसूल विभागाच्या भूलेख महाभूमी पोर्टलवरून आता अवघ्या १५ रुपयांत सातबारा उतारा मिळू शकणार आहे. डिजिटल