Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगरात भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, तिघे जागीच ठार!

संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील बिल्डा फाट्याजवळ मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास भरधाव कारने पुलावरील दुभाजकाला धडकल्याने तिघेजण जागीच ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.



छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असलेले ५ जण कार (एमएच २० इ जे १५८६) ने फुलंब्रीहून छत्रपती संभाजीनगरकडे येत होते. मंगळवारी रात्री ११च्या सुमारास त्यांच्या भरधाव कारने बिल्डा गावानजीक असलेल्या पुलावरील रस्ता दुभाजकाला जोराची धडकली. त्यानंतर ही कार उलटली. यात कारमधील सय्यद मारुफ सय्यद माजेद, अरफात बागवान व रेहान सय्यद यांचा जागीच मृत्यू झाला, तर सय्यद उजेफ व शेख शारीक हे दोघे गंभीर जखमी झाले. याबाबत माहिती मिळताच फुलंब्री पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय सहाणे हे कर्मचाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

Comments
Add Comment

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी