के. जे. सोमय्यातर्फे एमबीए अभ्यासक्रमाच्या सहाव्या तुकडीस प्रारंभ

भारतासाठी भविष्यकालीन नेतृत्व घडवण्याचा संकल्प


मुंबई : कामकाज करणाऱ्या व्यावसायिकांसाठी खास तयार करण्यात आलेल्या ‘वर्किंग एक्झिक्युटिव्ह्जसाठी एमबीए’ या प्रमुख अभ्यासक्रमाच्या सहाव्या तुकडीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याची घोषणा सोमय्या विद्याविहार विद्यापीठाअंतर्गत कार्यरत असलेल्या के. जे. सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (केजेएसआयएम) या अग्रगण्य बी-स्कूलने केली. १५ महिन्यांचा हा ऑनलाइन अभ्यासक्रम मध्यम कारकीर्द गाठलेल्या व्यावसायिकांना प्रगत व्यवस्थापन व नेतृत्व कौशल्ये मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. आजच्या सतत बदलत्या आणि स्पर्धात्मक व्यावसायिक वातावरणात यशस्वी होण्यासाठी ही कौशल्ये अत्यावश्यक आहेत.



बीएफएसआय (बँकिंग, फायनान्स व विमा), आरोग्यसेवा, उत्पादन, विक्री व विपणन, आयटी/आयटीईएस अशा विविध क्षेत्रांत ३ ते १५ हून अधिक वर्षांचा अनुभव असलेल्या व्यावसायिकांकडून या अभ्यासक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भारतभरातील विविध भौगोलिक पार्श्वभूमी असलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी दाखल झाले आहेत.


हा अभ्यासक्रम सैद्धांतिक समज आणि प्रत्यक्ष अनुभव यांचा समन्वय साधणारा एकात्मिक शिक्षण अनुभव देतो. यात शिकणाऱ्यांना धोरणात्मक आणि विश्लेषणात्मक विचारक्षमता विकसित करण्याचे प्रशिक्षण दिले जाते, तसेच विवाद निवारण, कार्यसंघ व्यवस्थापन आणि सहानुभूतीपूर्ण संवाद यांसारखी प्रगत नेतृत्व कौशल्ये आत्मसात करण्यावर भर दिला जातो. विद्यार्थ्यांना परिवर्तनाचे नेतृत्व करण्यासाठी, व्यवसायिक पुनर्रचना घडवून आणण्यासाठी आणि डेटा-आधारित निर्णय घेण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रदान करणे हा या अभ्यासक्रमाचा केंद्रबिंदू आहे. तंत्रज्ञान-आधारित आणि अधिकाधिक गुंतागुंतीच्या होत चाललेल्या बाजारपेठेच्या पार्श्वभूमीवर ही तयारी विशेषकरून उपयुक्त ठरते.


लवचिक, भविष्याभिमुख नेतृत्वासाठीची मागणी भारतातील कार्यशक्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, अशा वेळी या नव्या तुकडीचा प्रारंभ होत आहे. ‘इंडिया स्किल्स रिपोर्ट २०२४’नुसार, देशात रोजगारयोग्यता पातळी ५१.२५ टक्क्यांपर्यंत वाढली असली, तरीही व्यवस्थापन कौशल्य, निर्णयक्षमता आणि प्रभावी संवाद यांसारख्या महत्त्वाच्या क्षमतांमध्ये अजूनही लक्षणीय कमतरता जाणवते. मध्यम स्तरावरील व्यवस्थापनात कौशल्यांचा असमतोल असल्याची कबुली ६५ टक्क्यांहून अधिक भारतीय वरिष्ठ व्यवस्थापकांनी दिली आहे, असे २०२३च्या ‘मॅकिन्से ग्लोबल रिस्किलिंग’ सर्वेक्षणातही नमूद करण्यात आले आहे. उद्योगाभिमुख अध्यापन पद्धतीद्वारे कौशल्यांमधील ही तफावत भरून काढण्याचे उद्दिष्ट या ‘एक्झिक्युटिव्ह एमबीए’मध्ये बाळगण्यात येत आहे. म्हणूनच आर्थिक व्यवस्थापन, डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, विपणन, धोरण आणि कार्यप्रणाली यांसारख्या आधुनिक व अत्यावश्यक विषयांत दर्जेदार शिक्षण देण्यावर हा अभ्यासक्रम भर देतो.

Comments
Add Comment

मुंबईत मलेरियाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईत मागील काही दिवसांपासून साथीच्या आजारांमध्ये प्रचंड वाढ होत असून मलेरियाच्या

मुंबईत पावसाचे टार्गेट पूर्ण, आतापर्यंत तब्बल १०३ टक्के पावसाची नोंद

मुंबई (खास प्रतिनिधी) : यंदा पावसाने वेळेआधीच हजेरी लावल्यानंतर ज्या प्रकारे बरसात करत आहे, ते पाहता आता मुंबईतील

दादर पश्चिमेला झाड कोसळलं, चारचाकी थोडक्यात बचावली

मुंबई: दादरच्या पश्चिम येथील पोर्तुगीज चर्च जवळील परिसरात झाड कोसळल्याची घटना घडली आहे. दादरच्या अमर हिंद

काहीही झाले तरी मुंबई महापौर महायुतीचाच असणार- देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहे. नेत्यांच्या

मुंबईत देवींच्या आगमन मिरवणुकांनी परिसर उजळले

मुंबई: शारदीय नवरात्रोत्सवाच्या आधी शहरात सर्वात पूज्य देवींच्या मूर्तींचे उत्साही स्वागत करण्यात आले.

मुंबई मेट्रो स्टेशनच्या खराब डिझाइनवर प्रवासी नाराज

मुंबई: मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पंख्यांची कमतरता असल्याबद्दल 'रेडिट'वरील एका पोस्टनंतर मुंबई मेट्रो