जिल्ह्यातील शेतकरी अद्याप नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत

अलिबाग : रायगड जिल्ह्यात २०२२ ते २०२४ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या ६५ हजार १९१ शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाई प्रशासनाकडे जमा झाली होती. मात्र, ५३ हजार शेतकऱ्यांची नुकसानभरपाई आजपर्यंत मिळालेली नाही. शेतकऱ्यांचे बँक खाते केवायसी अपडेट नसल्याने पैसे त्यांच्या खात्यावर जमा करण्यात अडचणी येत आहेत.


प्रशासनातर्फे शेतकऱ्यांनी केवायसी अपडेट करण्याबाबत आवाहन करण्यात आले. मात्र, शेतकरी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र समोर आले आहे.


२०२२-२४ या कालावधीत ६५ हजार १९१ शेतकऱ्यांचे २२ हजार ३०९.१९ हेक्टर क्षेत्र नैसर्गिक आपत्तीने बाधित झाले. या शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईपोटी २६ कोटी ७२ लाख ९८ हजार रुपये निधी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला होता.


यापैकी १२ हजार १३५ शेतकऱ्यांना ११ कोटी २९ लाख ५३ हजार रुपये निधी वितरित करण्यात आला. मात्र, ५३ हजार ५६ शेतकरी अद्याप नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. जिल्हा प्रशासनाकडे १५ कोटी ४३ लाख ४५ हजार रुपये निधी शिल्लक असूनही नुकसानभरपाईचे पैसे वितरित झाले नसल्याचे मागील आढावा बैठकीत समोर आले होते.


रायगड जिल्ह्यात अवेळी पाऊस, वादळ, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती, फळबागांचे नुकसान झाले. २०२२ मध्ये ऑक्टोबर, २०२३ मध्ये मार्च, जून, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, २०२४ मध्ये मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर या कालावधीत ६५,१९१ शेतकऱ्यांच्या २२,३०९.१९ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. दरम्यान, नुकसान झाल्यानंतर कृषी विभागातर्फे नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनाला पाठविण्यात आला होता. त्यानुसार, शासनाने २६ कोटी ७२ लाख ९८ हजार रुपये निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला होता.


निधी प्राप्त होताच जिल्हा प्रशासनाने ज्यांचे बँक खाते केवायसी अपडेट होते अशा १२ हजार १३५ शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी वर्ग केला आहे. मात्र, उर्वरित ५३ हजार ५६ शेतकऱ्यांचे बँक खाते केवायसी अपडेट केले नसल्यामुळे अनुदान निधीपासून वंचित राहिल्याचे सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

GI Tag White Onion Production : जीआय टॅग मिळूनही अडचण; पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनात मोठी घट

रायगड : बदलत्या हवामानाचा मोठा फटका यंदा अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यावर्षी

Mumbai Goa Expressway : कोकणात विकेंड रश; मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

माणगाव : उन्हाळी सुट्ट्यांची सुरुवात आणि सलग तीन दिवसांचा विकेंड यामुळे कोकणाच्या दिशेने पर्यटकांचा ओघ प्रचंड

मुंबई-गोवा महामार्गावर बस उलटून भीषण अपघात; ३८ प्रवासी जखमी दोघांचा मृत्यू

नागोठणे : शुक्रवारी ( ३ एप्रिल ) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका खासगी बसचा मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला.

कोकणातील दुर्गम भागात ऊर्जेचे नवे पर्व

लघु जलविद्युत विकास योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अलिबाग : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या

माथेरान पर्यटन स्थळावरील मूलभूत सुविधांचा बोजवारा

सुविधांची पूर्तता करण्यात प्रशासन हतबल माथेरान : पर्यटन नगरी माथेरान हे पर्यटनस्थळ म्हणून जगप्रसिद्ध असले तरी

उन्हाच्या तडाख्यात डोंगरदऱ्यातील रानमेव्याचा गारवा

करवंदे, कैरी, काजू, बोरांना वाढती मागणी खोपोली  : उन्हाळ्याचे आगमन होताच जंगलात तयार होणारा विविध प्रकारचा