पालखी सोहळ्यादरम्यान वाल्हेनगरीत वैष्णवांचा लोटला अलोट महासागर

पालखी खांद्यावर घेत ग्रामस्थांकडून विसाव्याला प्रदक्षिणा


पुणे : नाम गाऊ नाम घेऊ।।
नाम विठोबाला वाऊ।।
आमि दहिवाचे दहिवाचे दास पंढरीरायाचे।।


ही भावना मनी ठेवून कपाळी बुक्का, गंध लावून खांद्यावर भगव्या पताका उंचावत लाखो वैष्णवांनी टाळ-मृदंगांच्या गजरात आद्य रामायणकार महर्षी वाल्मीकी ऋषींच्या वाल्हेनगरीत (ता. पुरंदर) माउलींचा पालखी सोहळा विसावला. ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष करीत आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान आद्य रामायणकारांच्या वाल्हेनगरीत बुधवारी (दि. २५ ) वैष्णवांचा अलोट महासागर लोटला होता.


अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीनगरीचा निरोप घेऊन पहाटे सहाच्या सुमारास टाळ-मृदंगांचा गजर व हरिनामाच्या जयघोषामध्ये पालखी सोहळा वाल्हेनगरीकडे मार्गस्थ झाला. सकाळी साडेदहाच्या सुमारास दौंडज ग्रामपंचायतीच्या वतीने व ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. दुपारी ११.४० वाजेच्या सुमारास पालखीचा नगारखाना व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वाल्हेनगरीच्या वेशीवर दाखल झाला. या वेळी वाल्हेचे सरपंच अतुल गायकवाड, वागदरवाडीचे सरपंच सुनील पवार आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि तरुणांनी पुष्पवृष्टी करीत ‘माउली माउली’चा जयघोष करीत जोरदार स्वागत केले. यावेळी प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळाप्रमुख डॉ. भावार्थ देखणे, तहसीलदार विक्रम रजपूत आदींसह पुरंदर तालुक्यातील अनेक प्रशासकीय अधिकारीवर्ग उपस्थित होते.


आज पालखीचा लोणंदला मुक्काम
स्वागतानंतर पोलिस प्रशासनाच्या वतीने योग्य नियोजनामुळे एक तासाच्या आत सुकलवाडी फाट्याजवळील पालखीतळावर हा सोहळा पोहोचला. रथामधून पालखी काढून ग्रामस्थांच्या खांद्यावर देण्यात आली. ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन नाचवत पालखी विसाव्याला प्रदक्षिणा घातली. आरतीनंतर भाविकांनी दुतर्फा रांगा लावून माउलींचे दर्शन घेण्यास सुरुवात केली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा गुरुवारी (दि. २६) सकाळी साडे सहा वाजता निरा स्नानासाठी मार्गस्थ होणार असून, संध्याकाळी लोणंद येथे मुक्कामी जाणार आहे.


पुढील वर्षी तरी व्हावी ‘वाल्हे’ची ग्रामप्रदक्षिणा
वाल्हे गावची श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची परंपरा असलेली ग्रामप्रदक्षिणा आळंदी देवस्थानकडून मागील काही वर्षांपासून पालखीतळावर पोहचण्यास उशीर होत असल्याचे तसेच दुपारच्या जेवणाचे कारण देत बंद करण्यात आली आहे. यावर्षी पालखी सोहळा लवकरच महर्षी वाल्मीकी विद्यालयाजवळ सकाळी ११.४० वाजताच पोहचला होता. यावर्षीही ग्रामप्रदक्षिणा झाली नसल्याने ग्रामस्थांमधून नाराजीचा सूर व्यक्त होत होता. पुढील वर्षी पालखी महामार्गाचे काम पूर्णत्वास जाईल व या वर्षापेक्षाही पुढील वर्षी पालखी सोहळा लवकर वाल्हे गावच्या वेशीवर पोहचेल, असा अंदाज वर्तवीत वाल्हे गावची ग्रामप्रदक्षिणा सुरू होईल, अशी आशा ग्रामस्थांना आहे.

Comments
Add Comment

भारताचा इतिहास पराभवाचा नव्हे संघर्षाचा”- सरसंघचालक

नागपूर : भारतावर अनादी काळापासून सातत्याने हल्ले होत राहिले. परंतु, कुठलाही परकीय आक्रांता एक रात्र देखील

जिथे शक्य तिथे महायुती म्हणजे काय? महायुतीमध्ये नेमकं काय घडतंय? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...

नाशिक : पुढील काही महिन्यांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिका)

फडणवीसांकडून योगेश कदमांची पाठराखण! 'परवाना दिलाच नाही, तर आरोप कशाला?'

नाशिक : पुण्याचा कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना (बंदुकीचा परवाना) देण्याच्या

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मतदार यादीत तुमचं नाव आहे का? येथे शोधा...

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा/ पंचायत समित्या आणि नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार

शेतकऱ्याच्या ४ लाखांच्या चेक घोटाळ्याची पोलिसांत नोंद, बँक ऑफ महाराष्ट्रच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह

सोलापूर : बार्शी तालुक्यातील शेतकरी उत्तम दत्तात्रय जाधव यांच्या ४ लाख रुपयांच्या चेकचोरी प्रकरणात अखेर बँक ऑफ

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, भिडे पुलाबाबत झाला महत्त्वाचा निर्णय

पुणे : मेट्रोच्या कामांमुळे बंद ठेवलेला भिडे पूल आता वाहतुकीकरिता सुरू करण्यात आला आहे. शनिवार ११ ऑक्टोबरपासून