Railway ticket price : रेल्वेच्या तिकिट दरात वाढ, तत्काळ बुकिंगसाठी नवीन नियम जारी...

मुंबई : देशभरातील कोट्यावधी लोक रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वेने अनेक कालावधीनंतर भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेचे नवीन नियम १ जुलै २०२५ पासून लागू होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. तसेच रेल्वेने केलेले बदल प्रवाशांच्या सोयीसाठी आहे असं रेल्वे मंत्रालयाने म्हंटलं आहे.  रेल्वे मंत्रालयाने एसी, नॉन एसी, एक्सप्रेस गाड्यांमध्ये रेल्वेने १ रुपये वाढ केली आहे. तर एसी क्लासमध्ये प्रती २ रुपये किलोमीटर भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतू लांब पल्ल्याच्या धावणाऱ्या रेल्वे प्रवाशांकरीता  भाडेवाढीचा परिणाम देखील होणार आहे.  जर रेल्वेतून लांब पल्ल्याचा प्रवास करत असाल तर १४ रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. एसी क्लाससाठी २८ रुपये मोजावे लागणार असून ५०० किलोमीटरच्या रेल्वे प्रवासासाठी भाडेवाढ होणार नाही अशी रेल्वे मंत्रालयाने माहिती दिली.


तात्काळ तिकीट बुकिंगसाठी आधारकार्डाची गरज...


१ जूलै २०२५ पासून तात्काळ तिकिटे बुक करण्यासाठी आधारकार्ड आवश्यक आहे. रेल्वे मंत्रालयाने यापूर्वी १० जून रोजी रेल्वे झोनला माहिती दिली. त्यामुळे दलाल आणि अनधिकृत एजंटला फटका बसणार आहे.


तात्काळ तिकिट वेबसाईट आणि अॅपद्वारे बुक करता येणार... 


इथून पुढे तात्काळ तिकिट बुक करण्यासाठी प्रवाशांना आयआरसीटीसी (IRCTC) च्या वेबसाईट किंवा अॅपद्वारे तिकिट बुक करता येणार. म्हणजेच आधारकार्ड ओटीपी पडताळणीसाठी गरजेचे आहे.सामान्य प्रवाशांसाठी तात्काळ तिकिट बुक करता यावे यासाठी रेल्वे प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य असल्याचं प्रवाशांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

कांदिवलीत उंच इमारतीला आग; आठ जणांना वाचवले

मुंबई : रविवारी सकाळी कांदिवली (पश्चिम) येथील अग्रवाल रेसिडेन्सी या उंच इमारतीत लागलेल्या आगीने परिसरात खळबळ

MPSC 2026 चे वेळापत्रक जाहीर, सविस्तर वाचा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, गुंदवलीवरून थेट गाठता येणार मिरा रोड

मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या गुंदवलीवरून निघालेली मेट्रो दहिसर पूर्व

देशामध्ये २२ बनावट विद्यापीठे

‘यूजीसी’ने जाहीर केली यादी मुंबई  : मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास